e-Shram : जर ई-श्रम कार्ड असेल तर बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरगुती कामगार आणि इतर अनेक कामगारांना मिळणार हे लाभ, जाणून घ्या

48

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुरु केलेल्या ई-श्रम पोर्टलला (E Shram Portal)असंघटित कामगारांचा चागलाच प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत देशभरातील साडे नऊ कोटी कामगारांनी यावर नोंदणी केली आहे.

त्यामुळे या कामगारांना आता केवळ त्या-त्या राज्यांमध्ये सरकारी योजनेचा लाभ मिळणार नसून संपूर्ण देशभरात कोणत्याही राज्यामध्ये त्याचा लाभ मिळणार आहे.

देशातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरु केलं आहे. विशेषत: कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.

बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित कामगार, रस्त्यावरील विक्रेते आणि घरगुती कामगार आणि इतर अनेक कामगार हे आपली नोंदणी करू शकतात. यामध्ये नोंदणी केल्यानंतर, कामगारांना 12 अंकी नंबरचे लेबर कार्ड (Labour Card) दिले जाईल .त्या कार्ड वर त्या व्यक्तीचे नाव, व्यवसाय, पत्ता, शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि कौटुंबिक माहिती असे डिटेल असेल. या कार्डमुळे कामगारांना भविष्यात सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.

ई-श्रम पोर्टलवर अशी नोंदणी करा

1. ई-श्रम पोर्टलमध्ये नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम या लिंकवर भेट द्या.
2. यानंतर Register on e-shram वर क्लिक करा.
3. समोर आलेल्या self Resistration Block मध्ये तुमच्या आधार कार्डची नोंद करा.
3. त्यानंतर देण्यात आलेला अचूक कॅप्चा कोड भरा. नंतर आपला मोबाईल नंबरची नोंद करुन त्यावर आलेला ओटीपी नंबर भरा, नंबर व्हेरिफाय करून घ्या.
4. पुढील पेजवर तुमची वैयक्तिक माहिती भरा.
5. सर्व माहिती भरून झाल्यानंतर Register बटणावर क्लिक करा.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी आपले ओळखपत्र, आधार कार्ड, बँक खाते पासबूक किंवा बॅंक डिटेल, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो असणं अनिवार्य आहे.

जर एखाद्या कामगाराचे आधार कार्ड मोबाईलला कनेक्ट नसेल तर जवळच्या कम्युनिटी सर्व्हिस सेंटरला भेट द्या आणि बायोमेट्रिक ऑथेन्टिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. यानंतरही जर काही समस्या आली तर 14433 हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्यावर कॉल करुन आपल्या समस्येचं निवारण करता येईल.

ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कामगाराला 12 अंकी युनिक नंबर असलेले ई-श्रम कार्ड देण्यात येईल. त्याच्या मदतीने या कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या सर्व योजनांच्या अंतर्गत आणण्यात येणार आहे.