Aadhaar आणि PAN Cardचे काय केले पाहिजे, पाहा नियम…

72

नवी दिल्ली : एरवी आधार कार्ड (Aadhar card)आणि पॅन कार्डशी (PAN card) निगडीत विविध प्रक्रिया आपण पूर्ण करत असतो. मात्र फारच थोड्या लोकांना याची कल्पना असते की एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर त्याच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डचे काय केले पाहिजे. आधार कार्ड, पॅन कार्ड स्वत:जवळ ठेवले पाहिजेत की नाही, की सरकारी विभागांकडे जमा केले पाहिजेत.

ही कागदपत्रे कशी हाताळावीत आणि त्यांचे काय करावे हे जाणून घेऊया. (What to do with Aadhar card & PAN card after someone dies)

आधार कार्ड

आधार नंबर हे ओळखपत्र असते आणि पत्त्याचा पुरावा असते. एलपीजी सब्सिडीचा लाभ घेणे, सरकारी शिष्यवृत्तीचा लाभ, ईपीएफ खाते इत्यादी बाबींसाठी आधार क्रमांक आवश्यक असतो. आधार एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरदेखील त्याचा नंबर तसाच राहतो. आधारचे नियमन करणारी संस्था युआयडीएआय (UIDAI)अद्याप राज्यांमधील मृत्यूप्रमाण देणाऱ्या व्यवस्थेशी जोडण्यात आलेली नाही. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणपत्र आपोआप अपडेट होत नाही. सध्या मृत्यूची नोंदणी किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आधार आवश्यक नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी याची खातरजमा करायची असते की त्याचा दुरुपयोग होऊ नये.

UIDAI कडे मृत व्यक्तीचे आधार कार्ड डीअॅक्टिवेट करण्याचे किंवा रद्द करण्याची कोणतीही प्रक्रिया नाही आणि आधार डेटाबेसमध्ये कार्डधारकाच्या मृत्यूसंदर्भात माहिती अपडेट करण्याची कोणतीही तरतूद नाही. अर्थात बायोमेट्रिक नोंदणीचा दुरुपयोग थांबवण्यासाठी कायदेशीर उत्तराधिकारी UIDAIच्या वेबसाईटवर मृत व्यक्तीचे बायोमेट्रिक लॉक करू शकतात.

पॅन कार्ड

पॅन कार्डचा उपयोग बॅंक खाते, डीमॅट खाते, प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी केला जातो. अशावेळी पॅन कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास जर प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावयाचे असल्यास कुटुंबाला पॅन कार्डची आवश्यकता पडणार नाही. जर मृतकाचे इन्कम टॅक्स रिफंड बाकी असेल तर ही रक्कम त्याच्या बॅंक खात्यात जमा होईल. अशा स्थितीत बॅंक खाते बंद करण्यासंदर्भात आणि इन्कम टॅक्सशी संबंधित काम झाल्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स विभागाला पॅन कार्ड सरेंडर करू शकता. पॅन कार्ड सरेंडर करण्यासाठी कायदेशीर उत्तराधिकाऱ्याला असेसिंग अधिकाऱ्याला अर्ज लिहावा लागेल.

पत्रात पॅन कार्ड सरेंडर करण्यासचे कारण म्हणजेच पॅन कार्ड धारकाचा मृत्यू, नाव, पॅन आणि मृतकाची जन्मतारीख, त्याच्या मृत्यूच्या दाखल्याची एक प्रत सोबत जोडावी लागेल. हा अर्ज तुम्हाला असेसिंग ऑफिसरकडे जमा करायवयाचा आहे. याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवर मिळेल. अर्थात मृतकाचे पॅन कार्ड सरेंडर करणे बंधनकारक नाही. जर तुम्हाला वाटत असेल की याची गरज भासू शकते तर तुम्ही हे तुमच्याजवळ ठेवू शकता. अशा परिस्थितीत आधार कार्ड आणि पॅन कार्ड दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते.