मूल:- शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांनास्वच्छतेची सवय लागावी आणि त्या माध्यमातून
त्यांचे आरोग्य निरोगी राहावे,यासाठी भारत सरकारच्याशहरी व ग्रामीण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी विविध
स्पर्धाचे आयोजन करण्यात येते.2021 वर्षाकरीता घेण्यात आलेल्या स्वच्छ व संुंदर शहराच्या
विविध स्पर्धेपैकी वेस्ट झोन सिटीझन फिडबॅंक अंतर्गतघेण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर शहराच्या विविध स्पर्धेपैकी
वेस्ट झोन सिटीझन फिडबॅक अंतर्गत घेण्यात आलेल्यास्पर्धेत मूल नगरपरिषदेने प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळविला
आहे..यापूर्वीही मूल नगर परिषदेला स्वच्छतेअंतर्गत उत्कृष्ठकार्ये केल्याबदल अनेक पुरस्कार मिळाले आहे.
दिल्ली येथील विज्ञान भवन येथे शनिवारी पार पडलेल्यापुरस्कार वितरण सोहळयात देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांचे हस्ते विविध पुरस्काराचे वितरण पार पडले.यावेळी केंद्रीय शहरी व गा्रमीण विभागाचे मंत्री
हरदीपसिंह पुरी आणि राज्यमंत्री कौशल आदीमान्यवर उपस्थित होते.
मूल नगर परिषदेला मिळालेला पुरस्कार मूलच्यानगराध्यक्षा रत्नमाला भोयर,मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम,अभियंता श्रीकांत समर्थ आणि आरोग्य निरीक्षकअभय चेपुरवार यांनी स्वीकारला.स्वच्छतेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचीप्रतिकृती आणि सन्मानपत्र देऊन मूल नगरपरिषदेचागौरव करण्यात आला.
यावर्षी मिळालेला स्वच्छ अमृत महोत्सवाचा पुरस्कारात नगरिकांचे विशेष योगदान लाभल्याने हा पुरस्कारनगरिकांना बहाल करीत असल्याचे मत नगराध्यक्ष रत्नमाला भोयर यांनी व्यक्त केले.