ताडोबात वाघाचा महिला वनरक्षकावर हल्ला

22
चंद्रपूर, 20 नोव्हेंबर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (tadoba andhari tiger reserve) मोठी घटना घडली आहे. एका महिला वनरक्षकावर वाघाने हल्ला (tiger attack on woman forest ranger) केला आहे.
या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला आहे. मृतक महिला वनरक्षकाचे नाव स्वाती ढुमणे असे आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात स्वाती ढुमणे गेल्या होत्या.

प्रकल्पाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 मध्ये ही घटना घडली आहे. (Woman forest ranger Swati Dhumane died in tiger attack) काय घडलं नेमकं? 43 वर्षीय स्वाती ढुमणे व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र.

97 येथे पोहोचल्या त्यावेळी वाघाने हल्ला केला. स्वाती ढुमणे यांच्या सोबत 4 वनमजूर सुद्धा होते. त्यांनी वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले.

घनदाट जंगलात आढळला मृतदेह यानंतर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. तातडीने अधिक कुमक बोलावली गेली. ही माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आसपासच्या परिसरात शोध मोहिम हाती घेतली. वरिष्ठ अधिकारी -अधिक कुमक आल्यावर शोधमोहिमेत मृतदेह सापडला.