बेंबाळ वनपरिक्षेत्रात पटटेदार वाघाने केले गायीला ठार

25

मूल:- दि 13/11/2021 ला बेंबाळ वनपरिक्षेत्रात सुरेश निलमवार यांच्या गाईवर पटेदार वाघाने हल्ला करून गाईला जागीच ठार केले. व शेपडाकडील भाग खाऊनफस्त केला. बेंबाळ परिसरातील शेतीचा क्षेत्र हा खुप मोठा असून आश्चर्चयाची गोष्ट म्हणजे हल्ला झालेल्या ठिकाणाहून शेती काही अंतरावरच आहे.घडलेल्या घडनेची माहिती मिळताच गाईचे मालक सुरेष निलमवार ,बेंबाळ ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच पांडूभाउु कंकलवार,मारोती आउुलवार,युवा तालुका काॅग्रेस अध्यक्ष  पवन निलमवार लगेच घटनास्थळ पेाहोचले.
मृत गाईची अवस्था बघून सुरेष निलमवार यंाना अश्रू अनावर झाले. घटलेल्या घटनेची माहिती वनपरिक्षेत्रअधिकारी यांना मिळताच घटनास्थळी जाऊन अजय बोधे,सुरज मेश्राम,सातपुते यांनी पंचनामा केला व पुढील तपास करूननुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.