शेतकरी असल्याचा दाखला काढण्यासाठी कुठे कराल अर्ज? कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक

116

देशात मोठ्या प्रमाणात लोक शेती करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे, असं म्हटलं जातं. कोरोना काळात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कृषी व कृषीपूरक व्यवसायांनी सावरल्याचं समोर आलं होते. शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र कुठे काढायचं. शेतकरी प्रमाणपत्राचा फायदा नेमका काय हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कृषी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना शेतकरी असल्याचा दाखला सादर केल्यास फायदा होतो. जमीन खरेदी करत असताना देखील अनेकदा शेतकरी प्रमाणपत्र सादर करावं लागते.  (How to get agriculturist certificate from Aaple Sarkar)

शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?

शेतकरी प्रमाणपत्र तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्रात किंवा महाराष्ट्र सरकारनं सुरु केलेल्या आपले सरकार पोर्टलवर देखील उपलब्ध होते. तुम्हाला जो पर्याय सोपा वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे प्रमाणपत्र मिळवू शकता. आपले सरकारच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही प्रमाणपत्र मिळवू शकता.

शेतकरी प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे

ओळखीचा पुरावा

पॅन कार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, सरकारकडून देण्यात आलेले ओळखपत्र यापैकी एक कागदपत्रं

पत्ता दर्शवणारा पुरावा

पासपोर्ट, आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पाणी बील, ड्रायव्हिंग लायसन्स, फोटो, वीज बील, घरफळा पावती, सातबारा किंवा 8 अ उतारा, यापैकी एक कागदपत्रं

इतर कागदपत्रे

शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जमिनीचा सात बारा किंवा 8 अ उतारा उपलब्ध असणं आवश्यक आहे.

स्वंयघोषणापत्र

शेतकरी प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वंयघोषणापत्र भरु द्यावं लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत भरुन द्यावं लागतं.

आपले सरकार पोर्टलवर किंवा तहसीलदार कार्यालयात वरील सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर 15 दिवसांच्या कालावधी मंजूर होईल.

 

भारताचा विचार केला तर भारत हा कृषिप्रधान देश आहे. जवळ जवळ 70 टक्के लोकसंख्या ही शेती उद्योगावर अवलंबून आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. आता कोरोना का असा जरी विचार केला तरी भारताच्या अर्थव्यवस्था जर सावली असेल तर ते कृषी मुळेच.

परंतु शेतकऱ्यांसाठी शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र असते आणि ते कुठे काढायचे याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते. तर या लेखामध्ये आपण शेतकरी प्रमाणपत्र बद्दल माहिती करून घेणार आहोत.

 शेतकरी प्रमाणपत्र कुठे मिळते?

शेतकरी प्रमाणपत्र हे प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालय मध्ये असलेल्या सेतू केंद्रात व महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपले सरकार या पोर्टल वर देखील उपलब्ध असते. जर तुम्हाला शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र आपले सरकार पोर्टल वरून मिळवायचे असेल तर तुम्ही ते https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून मिळवू शकतात.

शेतकरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, रोजगार हमी योजना ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पैकी एक कागदपत्र ओळखीचा पुरावा म्हणून द्यावे लागते.
  • शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वतःच्या नावे असलेल्या शेतीचा सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी असल्याचा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी स्वयंघोषणापत्र भरून द्यावे लागते. हे सर्वांसाठी अनिवार्य असून अर्जासोबत जोडावे लागते.

आपले सरकार पोर्टल वर ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • आपले सरकार पोर्टल च्या संकेतस्थळावर गेल्यानंतर नवीन वापर करता नोंदणी या लिंकवरून स्वतःचे नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून तुमचं लॉगीन तयार करा.
  • लॉगिन तयार केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध भाग पाहायला मिळतात त्यापैकी महसूल विभाग सिलेक्ट करा.
  • महसूल विभाग सिलेक्ट केल्यानंतर त्यात महसूल सेवा हा ऑप्शन निवडा. त्यामध्ये पुढील शेतकरी प्रमाणपत्र हा पर्याय दिसतो. पुढे एक विंडोज ओपन होते त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची लिस्ट दिसते. त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करावेत.
  • वेबसाईटवर जाऊन वैयक्तिक माहिती, पत्ता, मागील किती वर्षापासून तुम्ही संबंधित पत्त्यावर हात आहेत याबाबतची माहिती सादर करावी.
  • अपलोड करायचे असलेली कागदपत्रे 75 केबी ते 500 केबी च्या दरम्यान असावी. सर्व कागदपत्रे आणि फोटो आणि सही अपलोड करावेत. त्यानंतर अर्ज सबमिट करावा.आपले सरकार पोर्टल वरून अर्ज केल्यानंतर पंधरा दिवसांपर्यंत आपल्याला शेतकरी प्रमाणपत्र मिळते.