सध्या आधार कार्ड सध्या एक महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे.आधार कार्डाचा वापर सरकारी स्क्रीम्सचा वापर करण्यासाठी,तसंच एलपीजी गॅस सब्सिडीसह अनेक गोष्टीसाठी केला जातो. अशातच आधार कार्डावरील तुमची आधार आधार वरील महिती योग्य असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला नाव,पत्ता,लिंग किंवा जन्म तारीख बदलायची असेल तर त्यात किती वेळा बदल करता येतो हे तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही यातील काही बदल आॅनलाईन पध्तीनंही करू शकता.
किती वेळा करू शकता करेक्शन ?
1 नाव :- नावात केवळ दोन वेळा करेक्शन करता येतं.
2 जन्मतारीख:- यात केवळ एकदाच करेक्शन करता येतं.
3 पत्ता:- तुम्हाला तुमचा पत्ता बदलायचा असल्यास त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही
4 लिंग:- यामध्ये तुम्ही केवळ एकदाच बदल करू शकता.
5 मोबाइल नंबर:- मोबाईल क्रमांक,अपडेट करण्यासही कोणतीही मर्यादा नाही.
6.फोटो:- जर तुमचा फोटो क्लियर नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे
तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर तुम्ही फोटो कितीही वेळा बदलू शकता.
कशी कराल आधार कार्डाची पडताळणी ?
– सर्वप्रथम या थेट https://resident.uidai.gov.in/verify लिंकवर लाॅंगिन करा.
– पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्ट बाॅक्स दिसेल.
त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.
-त्यानंतर कॅप्चा कोड टाका.
-यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा
– तुमचा आधार क्रमंाक योग्य असल्याचा एक मॅसेज पेजवर डिस्पले
होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करून घ्या.
-तुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.