PM Kisan : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नोंदणी करा.सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते,नोंदणी कशी करावी?

43

शेतकर्‍यांसाठी आता मोठी बातमी आहे. जर तुम्ही देखील पीएम किसान (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळू शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan 10th installment) 10 वा हप्ता जारी करणार आहे. तारीख निश्चित केली असून, हप्ता हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आलीय.

गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले

आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये हस्तांतरित केलेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM KISAN योजना) 10 वा हप्ता जारी करण्याचा विचार करत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते.

नोंदणी करा

जर तुम्हाला पीएम किसानचा शेवटचा हप्ता मिळाला नसेल, तर पुढील हप्त्यासह मागील रक्कम मिळेल. तुम्हाला फक्त पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि अर्ज करावा लागेल. डिसेंबरमध्ये उपलब्ध होतील.

सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते

पंतप्रधान किसान योजनेंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. शासन ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन वर्ग करते. तुम्हीही शेतकरी असाल पण या योजनेचा लाभ घेऊ शकत नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही PM किसान सन्मान निधी मध्ये तुमचे नाव देखील नोंदवू शकता, जेणेकरून तुम्हाला सरकारच्या योजनेचा लाभ घेता येईल.

नोंदणी कशी करावी?

>> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
>> आता फार्मर्स कॉर्नरवर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

याचा फायदा कोण घेऊ शकतो?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो. या अंतर्गत शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर लागवडीयोग्य जमीन असावी.

तुमचं रेकॉर्ड कसं तपासणार?

स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.
स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.
स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.