समाजापासून दुरावलेल्या लहानग्या विधर्थ्यांसोबत वाढदिवस साजरा ठाकरे दाम्पत्याचा अनोखा उपक्रम

20

.मुल येथील ठाकरे दाम्पत्यानी मात्र आपल्या लोकसेवेचा परिचय देत सलग 7 व्या वर्षी आपल्या सामाजिक सेवेचा परिचय देत आपल्या मुलीचा वाढदिवस गरीब, अनाथ, अपंग अश्या समाजापासून दुरावलेल्या लहानग्या विधर्थ्यांसोबत साजरा करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
येथील प्रतिष्ठित व्यापारी राकेश ठाकरे आणि त्यांची पत्नी ऍड राजश्री ठाकरे हे आपली मुलगी राशी हीचा वाढदिवस दरवर्षी याच पद्धतीने साजरा करतात.


पहिला वाढदिवस हा बालविकास शाळा मुल येथे नोट बुक आणि खाऊ वाटप, दुसरा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय मुल येथे फळ वाटप करून,तिसरा वाढदिवस चंद्रपूर येथील किलबिल अनाथालय येथे अनाज आणि दुधाचे डब्बे वाटप करून,चवथा मुल येथील तेलंग यांच्या मूकबधिर शाळेत शालेय साहित्य आणि भोजनदान,पाचवा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत, सहावा आदिवासी गाव डोनी येथे जनतेला वाफारा मशीन, साबण आणि मास्क वाटप करत तर आज सातवा वाढदिवस विहिरगाव येथील जी प प्राथमिक शाळेत शालेय साहित्य वाटप करत साजरा केला.
आज च्या कार्यक्रमात ठाकरे दाम्पत्याची आई माजी नगरसेविका सौ रत्नमालाताई ठाकरे, कुनघाडकर मॅडम सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आष्ट्णकर,प्रशांत लाडवे, किशोर कापगते, विलास कागदेलवार, रवींद्र बरडे, श्याम उराडे, अमित राऊत, चेतन नागदेवते, पराग ढोक, बबलू बुटले,राकेश मोहूर्ले, कुमार दुधे, अक्षय गजापुरे यांची उपस्थिती होती.