भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

25

राजुरा 

राजुरा वरुर दरम्यान सुमठाणा फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन अपघातात मृतकाचा भाऊ जखमी झाला असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.प्राप्त माहितीनुसार सुमठाणा फाटय़ाजवळ ट्रक ला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एक दुचाकीस्वार ट्रकच्या समोर असलेल्या बसला धडकल्याने त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला असुन दुचाकीवर सोबत असलेला त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.