मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सैठी यांची महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत गावांना भेट

72

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत गाव विकासाची कामे केली जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य या विषयावर भर दिला जात आहे. दिनांक 21-10-2021 रोजी महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियान अंतर्गत मुल तालुक्यातील VSTF गाव भादुर्णी आणि कोसंबी ग्रामपंचायतीला मुख्य कार्यकारी अधिकारी मान. मिताली सेठी जिल्हा परिषद, मान. गट विकास अधिकारी खडसे सर मुल, मान. विद्या पाल ( जिल्हा समन्वयक, VSTF) यांनी भेट दिली. सदर भेटी दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी मॅडम यांनी प्रथमतः भादुर्णी या गावाला भेट दिली असता वाचनालयाची पाहणी केली. वाचनालयाची सद्यस्थिती जाणून घेतली, सुसज्ज इमारत, मुलांसाठी अभ्यास करण्याकरिता आवश्यक पुस्तके तसेच इतरही महत्वाच्या बाबी तिथे उपस्थित असलेल्या मुलांकडून विचारून घेतले. त्यानंतर भादूरणी येथील VSTF च्या पुढाकारातून महिलांनी उभारलेल्या “LED BULB” व्यवसायाची पाहणी केली. गटातील अध्यक्ष आणि सदस्यांशी चर्चा करून व्यवसायाविषयी जाणून घेऊन तयार केलेल्या व्यवसायाबद्दल CEO मॅडम यांनी महिलांची प्रशंसा केली. भादुर्णी येथील सरपंच, ग्रामसेवक इतरही कर्मचारी यांच्याशी गावातील सद्यपरीस्थितीचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कल्पनेतून शिक्षण विषयावर भर पडावी यासाठी VSTF, प्रथम शिक्षण संस्था, मॅजिक बस यांच्या समनव्यातुन शिक्षणदान मोहीम सम्पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविले जात असून गावातील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयाचे ज्ञान मिळावे यासाठी गावातील स्वयंसेवकांची निवड करून या उपक्रमाचा शुभारंभ गांधी जयंती पासून करण्यात आला असून त्याविषयीचा सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर कोसंबी येथे भेट देण्यात आली. येथील वाचनालय पाहणी करून शिक्षणात अधिक भर घालण्यासाठी इतर भौतिक सुविधा यावर गावातील उपस्थित नागरिक, सरपंच, ग्रामसेवक यांच्याशी चर्चा केली. शिक्षणदान मोहिमेबद्दलची माहिती, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर जाणून घेण्यासाठी मुख्यत्वेकरून मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सैठी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना गणितीय पाढे विचारले असता विद्यार्थ्यांनी पाढे म्हणून दाखविले. विद्यार्थ्यांशी चांगले हितगुज केले. उपस्थित असलेल्या इतर गावकरी आणि शालेय कर्मचारी यांचेशी संवाद साधला. कोरोनाकाळात शिक्षण क्षेत्रात खंड पडला असून विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटला होता. दीड वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून विविध विषयाचे धडे दिले गेले नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची गोडी निर्माण झाली पाहिजे यासाठी त्यात 100% भर घालता यावी यासाठी उपस्थित शिक्षक वृंद, स्वयंसेवक, मॅजिक बस स्वयंसेवक आणि vstf तालुका समन्वयक यांना सूचना केल्या. याप्रसंगी गावामध्ये सरपंच रवींद्र कामडी, भादुर्णी सरपंच रेवता सोनूले, ग्रामसेवक श्री. सुरज आकनपल्लीवार, भादुर्णी येथील ग्रामसेवक श्री. जि एस श्रीरामे सर, जिल्हा समन्वयक विद्या पाल, शिक्षक कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, बचतगट महिला, मॅजिक बस SSO , अंगणवाडी सेविका, तालुका समन्वयक दिक्षा वनकर उपस्थित होते.