जितेंद्र आव्हाड विरूध्द पोस्ट करणाऱ्या विरूध्द पोलीसात तक्रार

53

राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. जितेद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबियाविरूध्द सोशल मिडीयाच्या माध्यमातून अश्लील शब्दप्रयोग व जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणा-या ठाणे येथील अनंत करमुसे यांचे विरूध्द गुन्हा दाखल करावा. अशी तक्रार जितेंद्र आव्हाड मंच जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी पोलीस स्टेशन मूल येथे नोंदविली आहे. पोलीस स्टेशन मूल येथे दाखल केलेल्या तक्रारीत जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी ठाणे येथील अनंत करमुसे यांनी ना. जितेंद्र आव्हाड यांचेसह त्यांची पत्नी आणि मुलगी यांचे विरूध्द सोशल मिडीयाच्या माध्यमातून अश्लील पोस्ट टाकतांना मुस्लीम व इतर समाजात जातीय तेढ निर्माण होवून राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे वक्तव्य प्रसारीत केले आहे. अनंत करमुसे यांची ही गैरकृती पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्याच्या भावना दुखावणारी आणि स्त्री शक्तीचा अवमान करणारी आहे. त्यामूळे अनंत करमुसे यांचे विरूध्द भादवी 499, 500, 469 व 503 अन्वये पोलीस स्टेशन मूल येथे गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल. अशी तक्रार केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे बल्लापूर विधानसभा अध्यक्ष गौरव शामकुळे, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर अल्लुरवार, जितेंद्र आव्हाड मंचचे तालुकाध्यक्ष रोहीत निकुरे, सोनल मडावी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.