ओबीसींवर अन्याय करणाऱ्या भाजपा नेत्यांनी दिल्लीत ओबीसी जागरण अभियान राबावावे- ना. भुजबळ यांचे आवाहन

56

ओबीसींवर अन्याय करणाऱ्या भाजपा नेत्यांनी दिल्लीत ओबीसी जागरण अभियान राबावावे- ना. भुजबळ यांचे आवाहन

ईडी सारख्या यंञणांचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाहक ञास

 

मूल (प्रतिनिधी)
आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींवर अन्याय करणारी भाजपा लोकशाहीच्या संविधानावर वरवंठा फिरविण्याचे काम करीत आहेत. हे उघड सत्य असतांना भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन ओबीसींच्या मतांसाठी राज्यात चालवलेले ओबीसी जागरण अभियान भाजपाने दिल्लीत राबवावे. असे आवाहन ना. छगन भुजबळ यांनी केले.अखील भारतीय समता परीषदेच्या वतीने स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात आयोजित केलेल्या अभिनंदन सोहळ्यात बोलतांना ना. छगन भुजबळ यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांचे वारस ह्यात नसतांना काही मंडळी फुल्यांचे वारस असल्याचे सांगुन समाजाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. समाजकारण करतांना शरद पवार सदैव समोर असतात परंतु काही मनुवादी मंडळी समतेचे चक्र उलटे फिरविण्याचे काम करीत आहेत. या मंडळी पासुन ओबीसी समाजाने सावध राहावे असे आवाहन करतांनाना. भुजबळ यांनी राज्य सरकारला इंपेरीकल डाटा देण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. १०० कोटीच्या महाराष्ट्र सदनाचे कामात ८५० कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा अफलातुन आरोप करून आपणांस नाहक ञास दिला परंतु सदर प्रकरणात न्यायालयाने आपणास दोषमुक्त केल्याचे सांगतांना ना.भुजबळ यांनी सत्तेपासुन वंचित असलेली भाजपा केंद्र सरकारच्या अधिकारातील ईडी सारख्या यंञणांचा गैरवापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाहक ञास देत असल्याचे सांगितले. लोकहीताच्या योजना आणि प्रकल्प आपल्या मर्जीतील उद्योगपतींना विकणारे केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय आणि महागाईत वाढ करून सर्वसामान्य जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप करतांना ना. भुजबळ यांनी निराधार आरोपाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांसह त्यांच्या कुटूंबियांना नाहक ञास देण्याचा भाजपाने चालविलेला प्रकार महाराष्ट्राला आवडेल कां ? असा प्रश्न करत जातीचे राजकारण न करता केवळ ओबीसी संवर्ग डोळ्यासमोर ठेवुन ओबीसींची मुठ घट्ट आवळा. असे आवाहन ना. भुजबळ यांनी केले. याप्रसंगी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे राज्याध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी चंद्रपुरात निघालेल्या ओबीसी मोर्चाचा संदर्भ देत बल्लारपुर विधानसभा क्षेञ ओबीसी संवर्गाला देण्यासाठी ना. भुजबळ यांनी प्रयत्न करावे. अशी विनंती केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीषदेचे आयोजक चंद्रपूर जिल्हा पुर्व अध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान समता परीषदेच्या वतीने ना. भुजबळ यांचा तर सामाजिक कार्यात महत्वाचे योगदान देत असल्याबद्दल आयोजकाच्या वातीने डाँ. राकेश गावतुरे आणि डाँ. अभिलाषा गावतुरे या दाम्प्त्यांचा ना. भुजबळ यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समता परीषदेचे कार्याध्यक्ष बापु भुजबळ, विभागीय अध्यक्ष दिवाकर गमे, राकाँपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, अँड. बाबासाहेब वासाडे, रामभाऊ महाडोरे आदींसह अनेक मान्यवर उपस्थितहोते. कार्यक्रमाचे संचलन गुरू गुरनुले आणि ईश्वर लोनबले यांनी आभार मानले. यावेळी नागरीकांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.आभार ईश्वर लोनबले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंगेश पोटवार, गंगाधर कुनघाडकर, देवराव ढवस, युवराज चावरे, राकेश मोहुर्ले, विवेक मांदाडे, राकेश ठाकरे, पूरूषोत्तम कुनघाडकर, रामभाऊ चौधरी, प्रशांत लोनबले, सिमा लोनबले, प्रा. अर्चना चावरे, गौरव शामकुळे, हसन वाढई, माधुरी गुरनुले, किरण चौधरी, समीर अल्लुरवार, ओमलता लेनगुरे, ओमदेव मोहुर्ले आदींनी परीश्रम घेतले