उत्तरप्रदेश लखीमपुर खैरी प्रकरणात दोषींना कडक शासन करा- शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांची मागणी

54

उत्तरप्रदेश लखीमपुर खैरी प्रकरणात दोषींना कडक शासन करा- शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांची मागणी

उत्तरप्रदेश लखीमपुर खैरी प्रकरणात केन्द्रिय कृषी राज्यमंत्रि अजय मिश्रा यांच्या मुलास अटक केली परंतु हा दिखावा दाखवुन रक्षण करण्याचे काम केन्द्र सरकार तथा राज्य सरकार करित आहे तरी योग्य ती कार्यवाही करून कडक शासन करावे तसेच केन्द्रीय कृषी राज्यमंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केली.
मागील नऊ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीन शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत हे आंदोलन दडपून टाकण्याच्या हेतुने केन्द्रीय कृषी राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे सुपुत्र यांनी या आंदोलक शेतकरी यांच्यावर गाडी चालवून चिरडून आठ शेतकरी ठार झाले मात्र केन्द्र शासन तथा उत्तरप्रदेश शासन आरोपीला पाठीशी टाकण्याचे काम करीत आहे या घटनेतील आरोपीला कडक शासन करण्यात यावे असे निवेदन राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविद यांना मुल येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ना.तहसिलदार श्री.पवार यांच्या मार्फतीने शासनाला पाठवीले. मुल तालुका बंद ला अनेक प्रतिष्ठानने पाठींबा दिला याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार,उपतालुकाप्रमुख रवि शेरकी,शहर प्रमुख राहुल महाजनवार,तालुकाप्रमुख समन्वयक अनिल सोनुले,शहर समन्वयक अरविंद करपे,युवासेना तालुकाप्रमुख संदिप सुरेश निकुरे, युवासेना शहर प्रमुख योगेश ,मनिष मूलचंदानी, बंटी मिश्रा,विनोद बोर्डावार, विनोद काळबांधे, दिपक भोंगळे, अक्षय मडावी,पुनेश चिचोळकर ,बाला इन्नमवार असंख्य शिवसैनिक हजर होते.