भारतातील कोणत्याही नागरिकाला स्वतःची ओळख पटवण्यासाठी आधार नंबर (Aadhaar Number) हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट बनला आहे. 12 अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर केंद्र सरकारकडून भारतीय नागरिकांना जारी केला जातो. ज्यात त्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, फोटो सोबत त्याची बायोमेट्रिक माहिती सुद्धा आहे.
जर तुम्हाला आधारवरील फोटो आवडला नसेल तर तुम्ही ते बदलू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ला आधार नंबर जारी करण्याची आणि मॅनेज करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
UIDAI नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ई-मेल एड्रेस आणि फोटो बदलण्यासाठी फक्त ऑफलाइन सुविधा पुरवते. हे ऑनलाइन आणि पोस्ट द्वारे केले जाऊ शकत नाही. सोप्या शब्दात समजायचे तर एखादी व्यक्ती एनरोलमेंट सेंटरवर गेला तरच फोटो अपडेट करता येईल. फोटोमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या एनरोलमेंट सेंटरवर जावे लागेल किंवा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे काम देखील करू शकता.
आधार कार्डमधील फोटो बदलण्याची प्रक्रिया येथे आहे
1. सर्वप्रथम तुम्हाला UIDAI ची वेबसाइट http://uidai.gov.in वर लॉग इन करावे लागेल आणि आधार एनरोलमेंट फॉर्म डाउनलोड करावा लागेल.
2. हा आधार एनरोलमेंट फॉर्म भरा आणि जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये जमा करा.
3. आता कर्मचारी तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स आधार एनरोलमेंट सेंटरमध्ये घेईल.
4. आता आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी तुमचा फोटो घेईल.
5. आता आधार एनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी तुमच्या आधार कार्डमध्ये रुपये+GST चार्ज घेऊन फोटो अपडेट करेल.
6. आधारएनरोलमेंट सेंटरचा कर्मचारी तुम्हाला URN सोबत एक स्लिप देखील देईल.
7. तुम्ही या URN चा वापर करून तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासू शकता.
8. आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, नवीन फोटोसह अपडेट आधार कार्ड UIDAI च्या वेबसाईटवरून डाऊनलोड केले जाऊ