CTET 2021 Notification, Exam Date : सीटीईटी डिसेंबर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (CTET 2021 डिसेंबर परीक्षा) २० सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२१, ११:५९ वाजेपर्यंत असणार आहे.
CTET 2021 Notification, Exam Date : सीटीईटी 2021 डिसेंबरच्या वेळापत्रकाची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शनिवार, १८ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2021 च्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सीटीईटी परीक्षा (CTET Exam 2021) १६ डिसेंबर २०२१ पासून सुरू होईल आणि १३ जानेवारी २०२२ पर्यंत घेण्यात येईल.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (Central Teacher Eligibility Test 2021)सीटीईटी 2021 डिसेंबर परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटवर २० सप्टेंबरपासून जारी केले जाईल. (CBSE) संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये सीटीईटीची १५ वी आवृत्ती आयोजित करेल. ही परीक्षा देशभरातील 20 भाषांमध्ये घेतली जाईल. सीटीईटी 2021 अधिसूचना खाली दिली आहे. येथे महत्वाची माहिती जाणून घ्या-
- सीटीईटी ऑनलाइन अर्ज कधी सुरू होणार
CTET डिसेंबर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया (CTET 2021 December exam) २० सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑक्टोबर २०२१, ११:५९ वाजेपर्यंत आहे. उमेदवार २० ऑक्टोबर, दुपारी ३:३० वाजेपर्यंत अर्ज शुल्क जमा करू शकतात.
सीटीईटी अर्ज फी
पेपर -१ साठी अर्ज करणाऱ्या सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १००० रुपये आणि दोन्ही पेपरसाठी १२०० रुपये आहे. एससी (SC), एसटी (ST) आणि पीडब्ल्यूडी (PWD) उमेदवारांसाठी, पेपर -१ साठी अर्ज शुल्क ५०० रुपये आणि दोन्ही पेपरसाठी ६०० रुपये आहे.
सीटीईटी परीक्षेचा पॅटर्न बदलला
जुलै 2021 मध्ये, सीबीएसईने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) २०२१ परीक्षा पॅटर्नमध्ये सुधारणा करण्याबाबत आवश्यक अधिसूचना जारी केली होती. अधिकृत अधिसूचनेनुसार, प्रश्नपत्रिका कमी तथ्यात्मक ज्ञान आणि अधिक वैचारिक समज, अनुप्रयोग, समस्या सोडवणे, तर्क आणि गंभीर विचारांचे मूल्यांकन करण्यासाठी डिझाइन केल्या जातील. सीबीएसई लवकरच नवीन नमुना पेपर आणि ब्लू प्रिंट देखील जारी करेल.