फूड लायसन्‍स / परवाना

95

ज्‍या ज्‍या ठिकाणी खाण्‍याचे पदार्थ विकले जातात किंवा ठेवले जातात त्‍या सर्वांना हया लायसन्‍सची आवश्‍यकता असते. उदा. हॉटेल बेकरी व इतर सर्व व्‍यावसायीक. ,फूड व्यवसाय हा चांगला उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने हॉटेल व्यवसायाचा वाटा मोठा आहे.हॉटेल किंवा खाद्यगृह सुरु करणे सोपे असते.परंतु त्याची प्रत्यक्ष रीतसर कायद्याने नोंदणी करणेही महत्वाचे व बंधनकारक आहे. त्यासाठी पुढील कागदपत्रांची पूर्तता करून आपला व्यवसाय अधिकृत करता येईल.

  1. दोन फोटो
  2. आधार कार्ड  / पॅनकार्ड
  3. लाइर्ट बिल

हॉटेल परवाना आता केंद्रामध्ये उपलब्ध !!

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता Food Safety and Standard Authority of India (FSSAI) यांचे व्यवसाय मान्यता प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.

नागरिकांकडून जे पदार्थ खाण्यासाठी वापरले जातात त्या प्रत्येक पदार्थांची विक्री करण्यापूर्वी त्यांची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने सक्तीची केलेली आहे, अशा परवानगी शिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे,साठविणे,उत्पादन करणे बेकायदेशीर असून अशी बेकायदेशीर कृती करणारांवर गुन्हेही दाखल होऊ शकतात.यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानक प्राधिकरण (FSSAI) हे खाद्यपदार्थ विक्रीचा परवाना देवू करतात.हा परवाना मिळण्यासाठी पूर्वीच्या काळी खूप अडचणी येत असत.मात्र केंद्र सरकारने हे सर्व परवाने ऑनलाईन उपलब्ध केले आहेत.हा परवाना १ ते ५ वर्षांसाठी मिळू शकतो या परवान्यासाठी आवश्यक व्यवसायकाचा स्वतःचा फोटो, आधारकार्ड,अथवा मतदान कार्ड ,लाईट बिल  ही  कागदपत्रे आवश्यक असून ऑनलाईन परवाना  दिला जातो.

📜FSSAI फूड परवाना/नोंदणी

ज्या ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ बनवले जातात किंवा त्यांची विक्री केली जाते किंवा साठवले जाते त्या सर्व व्यवसायांना FSSAI फुड लायसन्स परवाना बंधनकारक आहे.

♻FSSAI नोंदणी (अन्न परवाना) काय आहे?
FSSAI – भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांची स्वायत्त संस्था आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हे भारतात अन्न सुरक्षा आणि नियमन संबंधित मजबुती नियम आहे ज्या अंतर्गत FSSAI स्थापन करण्यात आले आहे.
FSSAI परवाना किंवा FSSAI नोंदणी कोणत्याही अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक आहे. FSSAI नोंदणी सर्व खाद्यपदार्थ संबंधित व्यवसायांसाठी आवश्यक आहे. एक 14 अंकी नोंदणी/परवाना क्रमांक पैकिंग छापलेले किंवा व्यवसायाच्या आवारात प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

🥘FSSAI नोंदणी/परवाना कोणासाठी आवश्यक आहे ?
1.डेअरी युनिट
2.तेल प्रोसेसिंग युनिट
3.कत्तलखाणा मांस प्रक्रिया युनिट
4.Relabellers आणि Repackers
5.प्रत्येक Manufacturer किंवा अन्न प्रक्रिया युनिट
6.स्टोरेज यूनिट
7.घाऊक विक्रेता,किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार
8.ढाबा,खानावळ,क्लब/कँटीन,
9.अन्न कॅटरिंग,
10.हॉटेल,उपहारगृह Restaurant
11.खाद्यपदार्थ दुध वाहतुक
12.Marketer
13.फेरीवाला
14.निर्यातकार आणि आयातकार
15.Ecommerce / Online Food Delivery
16. फास्ट फूड,चायनीज सेंटर

📌FSSAI नोंदणी/परवाना प्रकार
1⃣.FSSAI नोंदणी
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना fssai नोंदणी आवश्यक

2⃣.FSSAI State License
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आणि 20 कोटीपर्यंत आहे त्यांना fssai state license आवश्यक.
-उत्पादन युनिट दररोज 2 टन पर्यंत क्षमतेचे, दुग्धव्यवसाय युनिट दररोज 50000 लिटर,
3 स्टार तारांकित हॉटेल्स आणि वरील, repackers आणि relebelling युनिट, क्लब उपाहारगृहे, सर्व कॅटरिंग व्यवसाय हे उलाढाल कशीही असली तरी राज्य परवान्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

3⃣.FSSAI Central License
-ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 कोटीपेक्षा जास्त आहे त्यांना fssai central license आवश्यक
-निर्यातकार आणि आयातकार आणि Ecommerce यांना FSSAI Central License

📑FSSAI नोंदणी परवाना साठी आवश्यक कागदपत्रे
1⃣Basic नोंदणी प्रमाणपत्र
1.आधार कार्ड/पॅन कार्ड
2.पासपोर्ट साईज फोटो
3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट

2⃣ FSSAI State/Central License
1.आधार कार्ड/पॅन कार्ड
2.पासपोर्ट साईज फोटो
3.पत्ता पुरावा(लाईट बिल किंवा रेंट अग्रीमेंट
4. पाणी तपासणी अहवाल (for Manufacturer and Hotel Restaurant )
5.अन्न वर्ग यादी,उपकरणे यादी, यूनिटचा फोटो
6.ब्लू प्रिंट (For Manufacturer processor only)
7.ईतर (व्यवसायानुसार)

🗓FSSAI नोंदणी परवाना वैधता
1 ते 5 वर्षासाठी अर्ज करु शकता. त्यानंतर नुतनीकरण करणे.

♻FSSAI नुतनीकरण
FSSAI फूड लायसन्सच्या उशीरा नूतनीकरणाची फी टाळण्यासाठी परवान्याची मुदत संपण्यापूर्वी 30 दिवस आधी तुम्ही FSSAI नोंदणी नूतनीकरण करणे आवश्यक आहे. मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी नूतनीकरण केले नाही तर मुदतीच्या संपण्याच्या दिवसापर्यंत ₹100 दर दिवस दंड म्हणून भरावे लागतात.
मुदत संपल्यानंतर FSSAI नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण करता येत नाही
मुदत संपल्यानंतर फुड लायसन्स साठी नवीन अर्ज करावा लागतो याची नोंद घ्यावी.

❇FSSAI परवाना फायदे काय आहेत?
1.अन्न व्यवसाय अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात
2.ग्राहक जागरूकता निर्माण
3.आपण FSSAI लोगो ग्राहकांना आपापसांत एक सदिच्छा तयार करू शकता
4.अन्न सुरक्षा सुविधा
5.संशोधन आणि विकास क्षेत्रातील सुरक्षा राखण्यासाठी जबाबदार आहे.
6.व्यवसाय विस्तार एक मोठी संधी

♻FSSAI नोंदणी किंवा परवान्यासाठी कसा अर्ज करावा
एफएसएसएएआय परवाना नोंदणी प्रक्रियेचा खाली उल्लेख केला आहे
-FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर अधिकृत संकेतस्थळ https://fssailicenseonline.com