स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – मोटारसायकल चोराला अटक

47

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – मोटारसायकल चोराला अटक

विविध गुन्हे उघडकीस – गुन्हा नोंद नसलेल्या चोरीच्या 3 मोटारसायकल जप्त

 

दिनाांक 29/08/2021 रोजी डॉ. खान ह्यांच्या दवाखान्याजवळ उभी असलेली आपली MH34AY2670 ह्या क्रमांकाची पॅशन प्रो मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार पंचशील नगर, तुकुम, चंद्रपूर येथिल रहिवासी असलेल्या मिलिंद भरत वाघमारे ह्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने रामनगर पोलिसांनी अप.क्र. 839/21 कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला. त्याच दिवशी रामनगर परिसरातून दुसरी मोटारसायकल देखिल चोरीला गेल्याची घटना घडली. एकाच दिवशी झालेल्या मोटारसायकलच्या दोन चोरीच्या घटनांमुळे
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अरववि साळवे, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अतुल
कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे ह्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे
शाखेच्या पथकाला कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे ह्यांनी आपल्या पथकाला शहरात गस्त वाढवून त्याचप्रमाणे सीसीटीव्ही
रेकॉर्डींग तपासुन तसेच संशयित गुन्हेगारांची चौकशी करून गुन्हे उघडकीस आणणेबाबत निर्देश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे
शाखेच्या पथकाने त्यानुसार कारवाई करून गोपनीय माहितीच्या आधारे
रेकॉर्डवरील गुन्हेगार राजु उर्फ राजकुमार बालाजी धुवे, वर्य 28 वर्षे, रा. अर्जुनी चारगाव, ता. वरोरा, जि. चंद्रपूर हा
वरील गुन्ह्यात चोरी केलेली मोटारसायकल घेऊन चंद्रपूर शहरात फिरत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने नाकाबंदी करून आरोपीस जटपुरा गेट परिसरात मोटारसायकलसह पकडले.