सिंतला येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी मोहन चलाख यांना शेतकरी कल्याण निधीमधून चाळीस हजाराची तात्काळ मदत

118

 मुल-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्या बरोबर बँकेच्या विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक बदल करून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाती घेतले तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत अनेक कॅन्सरग्रस्त व दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना बँकेचा आधार देण्याचे काम बँक करीत आहे. तालुक्यातील शिंतळ। येथील कॅन्सरग्रस्त शेतकरी श्री. मोहन अशोक चलाख यांना झाल्याचे लक्षात येताच बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी रुग्णाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेट घेऊन आजाराच्या उपचाराबाबत चर्चा करुन त्यांना शेतकरी कल्याण निधीमधून चाळीस हजार (४००००/-) रुपयांचा धनादेश दिला श्री. गणपतीच्या आशीर्वादाने तुम्ही लवकर बरे व्हाल अशा शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावर , भेजगावचे सरपंच तथा बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, सामाजिक कार्यकर्ते गुरुभाऊ गुरनुले , बँकेचे अधिकारी नांदूजी मडावी, धिवरू चलाख, माजी सरपंच देवराव भांडेकर, माजी उपसरपंच जनार्धन भुरसे, जीवनदास कुकुडकर,अविनाश वासेकर,भाऊजी वैरागडे,केमदेव नैताम,चामदेव नैताम,यादव बोदलकर,मधुकर बुरांडे,हर्षल भुरसे, यांचेसह गावातील अनेक नागरिक व कॅन्सरग्रस्त लाभार्त्यांचे समाजबांधव उपस्थित होते.

उपस्थित शेतकरी बांधव यांच्यासोबत धान पिकाबाबत चर्चा केली आणि श्री. गणपतीच्या आशीर्वादाने समस्त गावकऱ्यांना यावर्षी भरपूर उत्पन्न होवो,आपणा सर्वांचे आरोग्य चांगले राहावे अशी मनोभावे प्रार्थना गावकऱ्यांच्या वतीने गणपती चरणी केली असता संतोषभाऊ यांच्या सहकार्याबद्दल उपस्थित गावकऱ्यांनी भाऊंचे आभार मानले.