मूल येथे नामदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या समर्थनार्थ समता परिषदेतर्फे जल्लोष

41

मूल येथे नामदार छगनराव भुजबळ साहेब यांच्या समर्थनार्थ समता परिषदेतर्फे जल्लोष

मूल :–अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व ओबीसींचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनराव भुजबळ साहेब यांना विशेष न्यायालयाने निर्दोष ठरविल्याबद्दल त्यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे दिनांक 10 सप्टेंबर ला सकाळी 11:00 वाजता गांधी चौकात समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांच्या नेतृत्वात समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून व पेढे वाटून जल्लोष व आनंदोत्सव साजरा केला.

      यावेळी समता परिषदेचे पदाधिकारी,ओबीसी संघटनेचे कार्यकर्ते यांनी ना.छगन भुजबळ यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी समता परिषदेच्या महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्षा शशिकला गावतुरे,माजी जिल्हा परिषद सदस्य समता परिषदेचे मार्गदर्शक रामभाऊ महाडोळे ,माळी महासंघाचे विभागीय महासचिव गुरुदास गुरनुले,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर कुनघाडकर,समता परिषदेचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख व सल्लागार युवराज चावरे,जिल्हा सहसचिव तौसिफ सय्यद ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य डॉ.पद्माकर लेनगुरे,प्राचार्य केवलराम कऱ्हाडे, प्रा.किसन वासाडे,प्रा. गुलाब मोरे ,प्रा.प्रभाकर धोटे,हेमंत सुपणार,ना. जितेंद्र आव्हाड विचार मंचाचे युवा जिल्हाध्यक्ष मंगेश पोटवार, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष विक्रांत मोहूर्ले, हिरालाल भडके,युवा शहराध्यक्ष राकेश मोहूर्ले,समीर अल्लूरवार,यशवंत देवगडे ,दीपक महाडोळे ,युवा सामाजिक कार्यकर्ते गौरव श्यामकुळे,नामदेवराव गावतुरे , दुशांत महाडोळे ,ओमदेव मोहूर्ले,मधुकर लेनगुरे, राजेश्वर मोहूर्ले, रामभाऊ चौधरी,मनीष फटिंग तथा महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.