मूल:- “सर्वासाठी घरे” ही पंतप्रधान आवास योजना गरजू व गरीब लोकांसाटी महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत नगरपरिषद मूल ने फेब्रवारी 2020 मध्ये मंजूरी दिली. माहे एप्रिल- मे 2020 मध्ये व आॅगस्ट – सप्टेबर 2020या महिन्यामध्ये एकूण अनुदानापैकी 80,000 रूपये घरकुल धारकांना मिळाले. पण यानंतर काहीच अनुदान मिळाले नाही.आम्ही घरकुल धारकांनी हातउसने व इतर कर्ज काढून घर उभे केले. आतापर्यंत काहींच्या घरांचे पुर्ण तर काहीचे अर्धवट बांधकाम झालेले आहेत. त्यामुळे उर्वरीत अनुदान देवून घरकुल धारकांचे घराचे स्वप्न पूर्ण करावे असे निवेदन लाभार्थी घरकुल धारकांनी नगरपरिषद मुलचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांना दिलेले आहे.
दोन वर्षांपासून कोरोणा महामारी असल्यामुळे गरीबांच्या हाताला कोणतेही काम मिळाले नाही. यामुळे घरकुलधारक आर्थीक विवंचनेत सापडलेले आहेत.त्यामुळे लाभार्थी घरकुल धारकांनी बचत गट,बॅका,व काही खाजगी लोकांना कडून कर्ज घेतलेले आहे. हे कर्ज कसे फेडायचे हा मोठा घरकुल धारकापुढे गंभीर प्रष्न निर्माण झालेला आहे. घरकुल धारकांनी विनंती करूनही प्रषासन व लोकप्रतिनिधी कडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे आम्ही घरकुल कसे बांधायचे ? प्रश्न आम्हाला भेडसावत आहे. घरकुल धारकांची ही समस्या लक्षात घेवून रखडलेल्या घरकुलांचे अनुदान मिळवून दयावे व घरकुल धारकांना दिलासा दयावा अशी मागणी घरकुल धारकांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम हयांना निवेदन देतांना नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, अनिल गुरनुले,वैशाली कोपूलवार,वैषाली मषाखेत्री ,रसुल शेख,अशोक वाळके,बालाजी गुरनुले,रूकमा शेंडे ,ईश्वर गेडाम,मनोहर शेरकी,नंदा येरणे,दिवाकर मोहूर्ले,श्रीधर आगडे,मीरा मडावी,विठाबाई जेंगठे,वंदना ठाकरे,सरस्वती कोल्हे,भाउुराव सुखदेवे,आदी लाभार्थी घरकुलधारक उपस्थित होते.