परवानाधारक रिक्षाचालकांनी सानुग्रह अनुदानासाठी अर्ज सादर करावे

36

परवानाधारक रिक्षाचालकांनी सानुग्रह अनुदानासाठी अर्ज सादर करावे
चंद्रपूर : कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना आर्थिक सहाय्य म्हणून दीड हजार रुपये अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णयानुसार जाहीर करण्यात आले आहे. सदर अर्थसहाय्याचा लाभ हा थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये देण्यासाठी कार्यप्रणाली विकसित करण्यात आली असून परवानाधारक रिक्षाचालकांनी (६६६.३१ं्रल्ल२स्र१३े.ंँं१ं२ँ३१ं.ॅ५.्रल्ल) या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.

ज्या परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना सदर ऑनलाईन प्रणालीवर अनुदान प्राप्त करता आले नाही, अशा ऑटोरिक्षा धारकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑफलाईन स्वरुपात अर्ज सादर करता येईल. कार्यालयात अर्ज सादर करतेवेळी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती, वाहनाचा परवाना, आवश्यकता असल्यास आधार कार्ड, रद्द केलेले चेक ज्यावर अर्जदाराचे नाव असावे किंवा बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे सादर करावी.

ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याकरिता कार्यालयातील परवाना विभाग कक्ष क्र. १0 येथे संपर्क साधावा. तसेच परवानाधारक रिक्षाचालकांनी उपरोक्त संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा किंवा कार्यालयात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करून सानुग्रह अनुदान प्राप्त करून घ्यावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.