वाघाच्या हल्यात मृत व्यक्तीच्या वारसांनास पंधरा लक्ष रुपयाचा धनादेश वितरित

26

वाघाच्या हल्यात मृत व्यक्तीच्या वारसांनास पंधरा लक्ष रुपयाचा धनादेश वितरित

प्रतिनिधी मुल ,
मुल तालुक्यां अंतर्गत येणाऱ्या जनाळा येथील वनिता वसंत गेडाम या महिलेवर वाघाने ४/५/२१ ला हल्ला करून ठार केले होते. त्याचे पश्चात मयतांचे वारसाणास नुकसान भरपाई म्हणून शासन निर्णयातील तरतुदी नुसार १५०००००( पंधरा लक्ष) रुपये चा धनादेश वितरित करण्यात आला.

वनपरिक्षेत्र कार्यालय मुल चे वनपरिक्षेत्र अधिकारी मा. जी. आर. नायगमकर यांनी त्यांचे कायदेशीर वारसदार गोपिका परमेश्वर पोरते, साधना सुनील नैताम, दीक्षा वसंत गेडाम यांना पंधरा लक्ष रुपयाचा धनादेश वितरित केला त्यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते धनराज रामटेके सह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.