!! जाहीर निषेध !! दिनांक 31/08/2021 रोजी मूल नगरपरिषदेचे” संपूर्ण प्रशासकीय कामकाज in कडकडीत रित्या बंद

23

!! जाहीर निषेध !!

काल दिनांक 30/08/2021 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती. कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली,तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा “संघटित निषेध” करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.

राष्टीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद मूल अंतर्गत येणाऱ्या पथविक्रेता संघटनेने सुध्दा नगर परिषदे ला पाठिंबा देत या घटनेचा निषेध केला आहे हे महत्वचे. पथविक्रेता संघटने कडून जाहीर निषेध

हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाहीस च जायबंदी करतात

त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज दिनांक 31/08/2021 रोजी “Mul नगरपरिषदेचे” संपूर्ण प्रशासकीय कामकाज in कडकडीत रित्या बंद करण्यात आले.