आयटीआयमध्ये विविध व्यवसायात प्रशिक्षणासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू

83

चंद्रपूर:-येथील स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (मुलींची), ऑगस्ट २0२१-२२ मधील सत्राकरिता तसेच विविध व्यवसायात प्रशिक्षण घेण्याकरिता प्रवेश देणे सुरू आहे. सदर प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पद्धतीने राबविण्यात येत आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपयर्ंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रवेशोच्छुक उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरावा. प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर त्याबाबतचे प्रवेश निश्‍चितीकरणाचे शुल्क भरून प्रवेश अर्ज निश्‍चित करावा व त्यानंतर उमेदवारांनी आयटीआय असलेल्या व्यवसायनिहाय विकल्प सादर करावे. जेणेकरून प्रवेश घेतेवेळेस व्यवसायाची कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ऑनलाईन प्रवेश अर्जाकरिता निश्‍चितीकरण शुल्क हे मागासवर्गीय उमेदवारांकरिता रुपये १00, सर्वसामान्य प्रवर्गाकरिता रुपये १५0, तर महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारांकरिता रुपये ३00 इतके शुल्क भरणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रवेश निश्‍चितीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

मुलींच्या, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बेकर अँण्ड कन्फेक्शनरी, बेसिक कॉस्मेटालॉजी, कोपा, ड्रेस मेकिंग, वीजतंत्री, यूंट वेजिटेबल अँण्ड प्रोसेसिंग, सेक्रेटरियल पॅ्रक्टिस (इंग्लिश), सुईंग टेक्नॉलॉजी इत्यादी व्यवसाय उपलब्ध असून विविध व्यवसायाकरिता २00 जागा उपलब्ध आहे. प्रवेशाकरिता किमान १0 वी पास तर काही व्यवसायाकरिता १0 वी नापास उमेदवारांनासुद्धा प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासंबंधी तसेच अधिक माहितीकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे अथवा संस्थेचे गटनिर्देशक क्र. यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.