मूल तालुक्यातील रोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन

65

मूल तालुक्यातील रोजगार सेवकांचे कामबंद आंदोलन
मूल :-  मनरेगाअंतर्गत ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने शासन निर्णयालाअनुसरून विविध मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन दिले होते. मात्र सदरमागण्या मान्य न झाल्याने अखेर गा्रमरोजगार सेवक संघटना मूलच्या वतीने 23 आॅगस्ट
पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.गावागावांत मनरेगा अंतर्गत ग्रामरोजगार सेवक यांची नियुक्ती करण्यात आली असून
त्यांच्या मार्फत रोजगार हमीची अनेक कामे केली जातात.ग्रामस्तरावर रोजगार हमीच्या कामाचा महत्वाचा दुवा म्हणून रोजगार सेवकाकडे पाहिलेजाते. मात्र तोच रोजगार सेवक आज अनेक समस्यांनी त्रस्त असल्याचे दिसून येते आहे.त्यातील काही समस्यांचे निराकरण शासनाने करावे,याकरिता ग्रामरोजगार सेवकसंघटनेने काम बंद करण्याचे निवेदन दिले होते. मात्र त्याचा काहीच उपयोग न
झाल्याने अखेर तालुक्यातील रोजगार सेवकांकडून काम बंद करण्यात आले आहे.आंदोलन संघटनचे अध्यक्ष विलास सोनुले,सचिव अनुप लेनगुरे,सदानंद सोनुले,ओमदेवमोहूर्ले,मनोज मुत्यालवार,रितेश वंजारी,जीवन लेनगुरे सह गा्रमरोजगार सेवक सहभागी
झाले आहेत.