मुल नगरपरीषद अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी अनुदानच्या प्रतिक्षेत
घरकुल योजनेत खोडा,केंद्राचा वाटा मिळेना ! मूल येथील घरकूल लाभाथ्र्याची ससेहोलपट
मूल :— प्रत्येकाला घर या संकल्पने अंतर्गत पंतप्रधान घरकुल योजनेची मुहुर्तमेढ रोवण्यात आली.मात्र,या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने मुल तालुक्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या योजनेअंतर्गत मूल शहरातील घरकुल लाभाथ्र्यांना केंद्र सरकारच्या वाटयातून मिळणा—या अनुदानाचे रूपये अजून मिळाले नाही. त्यामुळे घरकुलाचे अनेकांचे स्वप्र अद्याप पूर्ण झालेले नाही. इकडे घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याकरीता उर्वरित हप्ता मिळाला नसल्याने लाभार्थी दोन वर्षापासून नगरपालिकेच्या पाय—या झिजवत आहेत.
लाभार्थी झाले कर्जबाजारी
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला. मजुर आणि छोटया व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला.आर्थीक परिस्थिती चांगली नसताना घराचे स्वप्न पूर्ण करण्याकरीता बहुतांश लाभाथ्र्याना कर्ज,उधारीवर पैसे घेतले,घरकुलांचे पैसे मिळतीलच ही त्यांची आशा होती.मात्र,दोन वर्षाचा कालावधी तरी केंद्राचे अनुदान मिळाले नसल्याने लाभाथ्र्याना कर्जाचा डोंगर वाढतो आहे.पंतप्रधान आवास योजनेत 2 वर्षापूर्वी घरकूल मंजूर झाले.मात्र,सुरूवातीच्या एक—दोन हप्ताचा निधी मिळाल्यानंतर उर्वरित अनुदान मिळत नसल्यामुळे मुल शहरातील लाभार्थीची प्रचंड ससेहोलपट सुरू आहे.
मागील दोन वर्षापूर्वी लाभार्थीना घरकुलाचा लाभ मिळाला. अनेकांचे बांधकाम पुर्णत्वास गेले. मात्र, मुल नगरपरीषद प्रशासनाने आज पर्यंत शेवटचा हप्ता दिला नाही. लाभाथ्र्याीचे रक्कम थकले आहेत. सावकारांकडून अनेकांनी व्याजाने पैसे घेऊन आपले घरकुल बांधकाम पूर्ण केले आहे. काहींनी दागिने गहाण ठेवून बांधकाम केले.दोन हप्ते मिळाले परंतू उर्वरीत निधी अजून पर्यंत मिळाला नाही तरी अनुदानाच्या प्रतिक्षेत असलेल्या लाभाथ्र्याना निधी प्राप्त करून दयावा अशी मागणी होत आहे.