आघाडी सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचून कांग्रेसचे संघटन मजबूत करा

23

मुल-भाजपाच्या सत्ता काळात श्रीमंत, कार्पोरेट व मोठे व्यापारी यांचाच फायदा झाला असून शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे रद्द केल्याने शेतकरी कर्जबाजारी आणि दारोदार झाला आहे. परंतु ग्रामीण गोर-गरीब जनतेच्या व सर्वसामान्य कुटुंबाच्या फायद्यासाठी भारतीय राष्ट्रीय कांग्रेस झटत आली आहे. म्हणून सी.डी.सी.सी.बँकेच्या माध्यमातून माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी स्वावलंबन योजना सर्वांसाठी राबविण्यात येत असून शेतकरी कल्याण निधी मधून जो मागेल त्याला किरकोळ व्यवसाय करण्यासाठी कमी व्याजदराने अतिशय कमी कागद पत्रात तात्काळ पन्नास हजार रुपये देऊन सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज देऊन अनेकांना व्यवसायाला लावण्याचे काम करीत आहे. आजही या योजनेत ४ कोटी रुपयांची तरतूद अध्यक्ष म्हणून मी केली आहे. याचा लाभ ,सर्व समान्य गोर गरीब जनतेनी घ्यावा.तसेच पुरुष व महिला बचत गटासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली आहे करिता कांग्रेस कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेनी सुद्धा बचत गट स्थापन करुन बँकेच्या योजनेचा आणि आघाडी ससरकरच्या योजना जनतेपर्यंत पोहचून कांग्रेसचे संघटन मजबूत करावे. व आपला आर्थिक विकास साधावा असे आव्हान सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी शेकडो उपस्थित कार्यकर्त्यांना केले. एवढेच नव्हेतर शेतकरी कल्याण निधीमधून संपुर्ण चंद्रपूर जिल्ह्यात कँसर,हार्ट,आणि दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी बँकेतर्फे ४० ,हजार रुपये विनामूल्य अनुदान म्हणून कित्येकांना दिले आहे. व पुढेही देण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचाही फायदा कार्यकर्त्यांनी सर्व सामान्य जनतेला मिळवून द्यावा व बँकेला सक्षम करावे असे आव्हान सुद्धा केले आहे. तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांनी संघर्ष करण्याची हिम्मत केली तर स्थानिक स्वराज्य संस्थेत कांग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. आजही तालुक्यात सर्वात जास्त ग्राम पंचायत कांग्रेसच्या ताब्यात आहेत असे उदाहरण रावत यांनी दिले. कांग्रेसच्या बळकटी करणासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या नेर्तृत्वात कांग्रेस कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याप्रसंगी तालूका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर यानीही कार्यकर्यांना संबोधीत करतांना *वन बूथ-टेन युथ तयार करुन युवकांना एकत्रित करावे असे मार्गदर्शन केले. जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते नत्थुपाटील आरेकर यांनीही कांग्रेस कशी पुढे येईल यासाठी प्रत्येक गावात कमिटीचे गठन करावे व तशी जबाबदारी सोपवावी असे मौलिक मार्गदर्शन केले. महिलांसाठी संघटनात्मक बांधणी करण्याची गरज आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊ शकतात यासाठी महिला बचतगट स्थापन करावे अशा सूचना महिलांना पंचायत समिती माजी सभापती वैशाली पुलावार यांनी केल्या. मेळाव्याला कांग्रेस पदाधिकारी दीपक वाढई, उपसभापती संदीप कारमवार,संचालक अखिल गागरेड्डीवार किशोर घडसे, डाँ.पद्माकर लेनगुरे, शांताराम कामडे, सोसायटी सभापती पुरुषोत्तम भुरसे,पुरूषोत्तम वाढई राजु कामडे विनायक झरकर अरूण पोटे चंदु जुमनाके अरविद बोरूले उपसभापती विनोद गाजेवार, सरपंच रवींद्र कांमडी,जालिंदर बांगरे,माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, सुरेश फुलझेले, विवेक मुत्यालवार, हसन वाढई योगेश शेरकी, लहू कडस्कर,सरपंच कडस्कर, गौरव पूपरेड्डीवार,राहुल मुरकुटे, गणेश खोब्रागडे,सुमित आरेकर,किशोर पेंदाम, जुमनाके,बंडू चिटमलवार,प्रदीप कामडे,राजेंद्र वाढई, विक्रम गुरनुले, विनोद कामडी, रुमदेव गोहणे, कैलास चलाख, अन्वर शेख, महिला कांग्रेसच्या अध्यक्षा रुपाली संतोषवार, नगर सेविका लीनाताई फुलझेले संदीप मोहबे कृष्णा सुरमवार, यांचेसह अनेक महिला कार्यकर्त्या, तालुक्यातील कांग्रेसचे सर्व सरपंच,उपसरपंच,सदश, सहकारी सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेच्या योजनांची माहिती व बचत गटविषयी माहिती श्री. वडगावकर यांनी उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे संचालन कांग्रेसचे तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर यांनी केले तर आभार युवक कांग्रेसचे अध्यक्ष पवन निलमवार यांनी मानले.