जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते चिखली येथे सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन

40

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते चिखली येथे सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन संपन्न…………………………………………..

मूल : १९ ऑगस्ट २०२१, गुरुवार….

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मूल तालुक्यातील चिखली येथे सार्वजनिक वाचनालय बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्या वाचनालयाचा उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते आज पार पडला.
यावेळी श्री. गजानन वलकेवार माजी उपसभापती, श्री. मुकेश गेडाम माजी सरपंच डोंगरगाव, श्री. दुर्वास कडस्कर उपसरपंच, श्री. राकेश जोलमवार सद्स्य, श्री.पंकज कडस्कर सद्स्य, सौ. ऊर्मिला कडस्कर सदस्या, श्रीमती चंदा कडस्कर सदस्या, सौ. शीतल कोवे सदस्या, श्री. विश्वनाथ कडस्कर माजी सरपंच, श्री. डोपाजी कडस्कर अध्यक्ष गुरुदेव सेवा, श्री. लहुजी कडस्कर सद्स्य, श्री. पुरुषोत्तम कडस्कर, श्री. सुभाष सुरपाम, श्री. राकेश कडस्कर व गावातील जेष्ठ नागरिक तसेच गावातील युवा वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.दुर्वास कडस्कर उपसरपंच चिखली यांनी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संदेश सर्वांनी अंगी बाळगावा. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आपण सदैव तयार असून जे लागेल ते आपण नक्की मदत करू असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे संचालन श्री. मनोज कोवे, प्रास्ताविक श्री. राकेश जोलमवार व आभार श्री. राकेश गेडाम यांनी केले.