आयटीआय प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक जाहीर; 6 सप्टेंबरला पहिली गुणवत्ता यादी

55

मूल :— शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण प्रवेशसंदर्भातील अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यामुळे आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणा—या उमेदवारांना दिलास मिळाला आहे.
विद्याथ्र्याना 31 आॅगस्टपर्यंत आॅनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे. तसेच अर्जात दुरूस्ती करता येणार आहे. प्रवेशाची पहिली यादी 6 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. आतापर्यंत ​तालुक्यात विद्याथ्र्यानी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज दाखल केले आहेत. विद्याथ्र्याना आयटीआयसाठी 31 आॅगस्टपर्यंत अंतिम मुदत असल्याने अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता आहे.एकीकडे अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन मार्ग मोकळा झाला असतानाच दुसरीकडे आयटीआय प्रवेशाचे टेन्शनही दूर होणार आहे. राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण प्रवेशासंदर्भातील अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रवेशाची पहिली यादी पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच्या आठवड्यात म्हणजेच 6 सप्टेंबरला जाहीर होणार आहे. उमेदवारांना 31 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहे, तसेच अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. आतापर्यंत 1 लाख 57 हजार विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज दाखल केले असून 31 vगस्टच्या अंतिम मुदतीपर्यंत ही संख्या 2 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. (Final schedule of ITI admissions announced; First list on September 6th)

विद्यार्थ्यांना काहीही शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील, तर त्याची दखल घेण्यासही सुरुवात केली आहे. प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक शंका असल्यास विद्यार्थ्यांनी नजिकच्या आयटीआयमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवाराला प्रवेश अर्जात सादर केलेल्या काही माहितीमध्ये बदलही करता येणार आहे. त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदवता येणार आहेत. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले आहे, त्याच प्रवेश अर्जांचा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार आहे. ज्या उमेदवारांनी प्रवेश अर्ज शुल्क भरलेले नसेल, असे अर्ज प्राप्तच झाले नाहीत, असे समजण्यात येणार आहेत. ते अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

प्रवेशाचे अंतिम वेळापत्रक पुढीलप्रमाणे

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे व अर्जामध्ये दुरुस्ती करणे – 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत

– पहिल्या फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे – 31 ऑगस्ट

– प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी -2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता

– गुणवत्ता यादीसंबंधी हरकती तसेच प्रवेश अर्जातील माहितीमध्ये बदल – 2 सप्टेंबर

– संकेतस्थळावर अंतिम यादी प्रसिद्ध होण्याची तारीख व वेळ – 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता

– पहिली प्रवेश फेरी – 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता (Final schedule of ITI admissions announced; First list on September 6th)