वाहनाचे धडकेने आजी, नातीचा मृत्यू

25

वाहनाचे धडकेने आजी, नातीचा मृत्यू

गावावर पसरली शोककळा ; पुढील तपास सुरू आहे

नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भिकेस्वर गावाजवळ आजी व नातीन सकाळी 6 सहा वाजता नागभिड ब्रम्हपुरी मार्गावर फिरायला गेल्या होत्या. याच वेळी नागपूर वरून भाजीपाला घेऊन जाणारे वाहन क्रमांक एम एच 33 टी 2740 आयशर वाहनाने उडविले यातच आजीचा घटना स्थळी मृत्यू झाला तर नातीनीचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला.

आजी ही सुगंधा विश्वनाथ अनवले वय 60 वर्ष व नातिन हार्दिक अमन मिसार वय 6 सहा वर्ष भिकेश्वर ह्या गावाजवळ असलेल्या रस्त्याने घराकडे जात असताना भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाहन चालक यांनी आजी नातीचा मृत्यू झाला असून कलम 304,279, भा द वी मोटार वाहन कायदा अंतर्गत 184,134,177 गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन चालक फरार आहे. सदर घटना सकाळी सहा वाजता झाली असल्याची नोंद घेतली आहे. सदर घटनेने भिकेस्वार व सुलेझरी गावावर शोककळा पसरली असून पोलिस स्टेशन चे ठाणेदार प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक कोरवते पुढील तपास करीत आहे.