ग्रामपंचायत कोसंबी येथे ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत आणि शाळेच्या क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण

48

ग्रामपंचायत कोसंबी येथे ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून  ग्रामपंचायत आणि शाळेच्या क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण

मूल :— तालुक्यातील ग्रामपंचायत कोसंबी येथे ७५व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत आणि शाळेच्या क्रीडांगण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले याप्रसंगी वृक्षारोपण कार्यक्रमाला कोसंबी ग्रामपंचायत चे सरपंच श्री रविंद्र किसन कामडी, उपसरपंच सारिका गेडाम, ग्रामपंचायत सदस्या सौ चंदाताई कामडी, आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य गण. ग्रामपंचायतचे सचिव सुरज आकनपल्लीवार, कोसंबी चे प्रतिष्ठित नागरिक विनोद कामडी, शामरावजी मोहुर्ले,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्ञानेश्वरी चौधरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर चौधरी, कोसंबी गावच्या पोलीस पाटील अर्चना मोहुर्ले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार, अनिल गांगरेड्डीवार, रामकृष्ण गिरडकर, वैशाली महाकरकार शिक्षिका आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.