Ration Cardमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडावे? संपूर्ण पद्धत लगेच जाणून घ्या.

25

रेशन कार्ड हा भारत सरकारने जारी केलेला एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. तुम्ही बहुतेक सरकारी कामांसाठी किंवा शाळा कॉलेजसमध्ये प्रवेश घेण्यासाठी रेशन कार्डाची गरज भासते. रेशन कार्ड हे तुमची ओळख आणि पत्ताचा पुरावा म्हणून वापरले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची नावं या रेशन कार्डमध्ये समाविष्ट केली जातात.

परंतु कालांतराने जेव्हा कुटुंब मोठ होत जातं तेव्हा या नवीन सदस्यांचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, लग्नानंतर, कुटुंबात नवीन सदस्य येतो किंवा घरात मूल जन्माला आलं किंवा मुलं दत्तक घेतले, तर त्याचे नावही रेशन कार्डमध्ये नोंदवावे लागते.
परंतु सरकारी काम म्हटल्यावर त्याला वेळ हा लागणारचं तसेच त्यासाठी काय काय करावे लागते हे काही लोकांना माहित नसते, त्यामुळे बरेच लोकं रेशन कार्डवर नवीन व्यक्तीचं नाव नोंदवण्याच्या प्रक्रियेला टाळतात किंवा पुढे ढकलतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, तुम्ही रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव सोप्या आणि जलद पद्धतीने कसे जोडू शकता.

लग्नानंतर जेव्हा नवीन सून घरी येते, तेव्हा रेशन कार्ड सोबत त्या मुलीला तिचा आधार कार्डही अपडेट करावा लागेल. मुलीला तिच्या वडिलांच्या नावाऐवजी तिच्या पतीचे नाव आणि तिचा पत्ता बदलावा लागेल. आधार अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ते घेऊन तुमच्या रेशन कार्डवर नाव टाकण्यासाठी घेऊन जावे लागेल.

नवीन सुनेचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी अन्न विभागाच्या अधिकाऱ्याकडे अर्ज पाठवावा लागेल त्याला तुमच्या नवीन आधार कार्डाची प्रत जोडावी लागेल.

जर तुमच्या घरात नवीन मूल जन्माला आलं असेल किंवा तुम्ही मूल दत्तक घेतले असेल, तर रेशन कार्डमध्ये त्याचे नाव नोंदवण्यासाठी आधी त्याचे आधार कार्ड बनवावे लागेल. आधार कार्ड बनविल्याशिवाय तुम्ही त्याचे नाव रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकणार नाही.

त्याचवेळी, आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला मुलाच्या जन्माच्या प्रमाणपत्राची (Birth Certificate) आवश्यकता असेल. आपण सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा केल्यानंतर, रेशन कार्डमध्ये आपल्या लहान बाळाचे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकता.