दहावी व बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी कागदपत्र गोळा करताना चांगलीच दमछाक होत आहे. सध्या कोरोना संकट आहे.त्यामुळे नियम पाळून विद्याथ्र्यांना विविध शासकीय कार्यालयातून कागदपत्र काढावी लागणार आहे.शासकीय कागदपत्र काढताना कोणती काळजी घ्यायची तसेच यासाठी कोणते कागदपत्र द्यावे लागते या संदर्भात विद्याथ्र्यांनी खचून न जाते पुढील प्रमाणे कागदपत्रे गोळा करावे.
उत्पन्नाच्या दाखलासाठी आवश्यक कागदपत्रे
उत्पन्नाचा तलाठयांचा दाखला,शहरातील असल्यास तलाठी कार्यालयातील उत्पन्नाचा दाखला
नोकरी असल्यास (आयकर विवरणपत्र )शेती असल्यास (सातबारा) रेशनकार्ड,आधारकार्ड,आणि एक छायचित्र
या दाखल्यासाठी महा—ईसेवा, केंन्द्र,आपले सरकार केंन्द्र,सेतू सुविधा केंन्द्र हा दाखला मिळविण्याससठी शासनाने 15 दिवसांची मुदत दिली आहे.
डोमिसाईल,वय,अधिवास आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
:— मूळ महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक
शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षाचा रहिवासी सिध्द करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे विज बिल,असेसमेंट उतारा,सातबारा,आदि)रेशनकार्ड,आधारकार्ड,आणि एक छायचित्र
या दाखल्यासाठी केंद्राकडे अर्ज करावा शासनाने 15 दिवसांची मुदत दिली आहे.
नॉन—क्रिमिलेअर सटिफिकेट (उच्च उत्पन्न गटात नसल्याबाबतचा दाखला )
जातीचा दाखला,रेशनकार्ड, आधारकार्ड,आणि एक छायचित्र
आठ लाखाच्या आतील उत्पन्नाचा तहसीलदारांचा दाखला
शाळा सोडल्याचा दाखला या दाखल्यासाठी महाईसेवा केंद्रात अर्ज करावा.हा दाखला मिळविण्यासाठी 15 दिवसाची मुदत
जातीचा दाखला
1) कुटुंबातील ज्याचा सन 1961 पूर्वी जन्म झाला आहे.त्या व्यक्तीचा पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणुन द्यावे.(शाळेचा दाखला ,तहसिल कार्यालयातील जन्म नोंदी,रक्तनात्यातील वंशावळ सिध्द करणारे पुरावे.
2) सन 1967 पूर्वीचा रहिवासीबाबतचा महसूल पुरावा
(उदा.1967पूर्वीच सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायतीकडून मिळणारे घरठाण पत्रक
3) रेशनकार्ड,आधाकार्ड,आणि एक छायचित्र
4)विशेष मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, आणि भटक्या जमाती
(एसबीसी,व्हीजेएनटी)
कुटुंबातील ज्याचा सन 1961 पूर्वी जन्म झाला आहे. त्या व्यक्तीचा जातीचा पुराव्यासाहित एक कागदपत्र पुरावा म्हणुन द्यावे (उदाहरणार्थ शाळेचा दाखला,तहसील कार्यालयातील जन्म नोंदी,रक्तनातात्यातील वंशावळ सिध्द करणारे पुरावे)
सन 1961 पूर्वीचा रहिवासीबाबतचा महसूल पुरावा (उदा.1961पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचायत कडून मिळणारे घरठाण पत्र,रेशनकार्ड,आधारकार्ड
अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती (एस.सी.,एस.टी)
कुटुंबातील ज्याचा सन 1950 पूर्वी जन्म झाला आहे.त्या व्यक्तीचा जातीच्या पुराव्यासहित एक कागदपत्र पुरावा म्हणून द्यावा.(उदा.शाळेचा दाखला,तहसील कार्यालयातील जन्म नोंदी)रक्तातील वंशवळ सिध्द करणारे पुरावे
सन 1950 पूर्वीचा रहिवासीबाबतचा पुरावा उदा 1950 पूर्वीचा सातबारा उतारा अथवा ग्रामपंचातय कडून मिळणारे घरठाण पत्रक
रेशनकार्ड,आधारकार्ड,आणि एक छायचित्र
अर्ज करण्याची अशी आहे प्रकिया :—
संबंधित तहसील कार्यालयातील महाईसेवा केंद्रात अर्ज जमा करावा. जातीच्या दाखल्यासाठी 1967,1961,आणि 1950 ही वर्ष मानीव दिनांक पुरावा ग्राहय धरले आहेत.या दिनांकापूर्वी जो रहिवासी पुरावा असेल त्या (उदा. सातबारा अथवा घरठाण पत्रक जर ,दुस—या तालुक्यातील असेल आणि सध्या अर्जदार हा चंद्रपूरात राहत असेल,तर अर्जदाराला सातबारा अथवा घरठाण पत्रक असलेल्या तालुक्यात अर्ज करावा लागतो)
आॅनलाईन अर्ज केल्यानंतर संबंधित कारकून,नायब तहसिलदार, तहसीलदार,प्रांत कार्यालयातील कार्यवाही पूर्ण केल्या जाते .
त्यानंतर अर्जाची पडताळणी होऊन डिजिटल स्वाक्षरी झाल्यानंतर महाईसेवा केंद्रातून जातीचा अर्जदाराला दाखला मिळतो. पालकांनी प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्र जावून दाखला काढावा,दलालापासून सावध राहून आपले नुकसान टाळावे.