मुल पंचायत समिती अंतर्गत सुशी दाबगावं येथील बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य

27

ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेल्या नालीने बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य
सुशी दाबगावं येथील नागरिकांना आरोग्याच प्रश्न गंभीर

मुल पंचायत समिती अंतर्गत सुशी दाबगावं येथील बसस्थानक परिसरात ग्रामपंचायतीने मागील वर्षी नाली खोदून ठेवल्याने त्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले असून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.सविस्तर वृत्त असे की. सुशी दाब गावं येथील बेघर वस्ती बस स्थानक परिसरात नागरिकांच्या घरातील सांडपाणी बाहेर नेण्याकरिता नाली नवती त्यामुळे सांड पाणी रस्त्याने वाहून मोठी घान निर्माण होत होती. ही बाब प्रस्तुत्त प्रतिनिधीने वर्तमान पत्रातून संबंधित प्रशासनास वारंवार लक्षात आणून दिल्याने याकडे जिल्हा परिषद सदस्य यांनी जन सूविधा योजनेतून नाली मंजूर केली. नाली चे काम त्याकाळी सदस्य असलेल्या सीताराम भांडेकर यांच्या मार्फत काम करविण्यात आले. नालीचे काम कसेबसे पूर्ण झाले मात्र नाली ची रक्कम शीलक राहिल्याने दुसऱ्या बाजूला नालीचे काम करण्याच्या हेतूने उन्हाळ्याच्या दिवसात खोदकाम करण्यात आले. मात्र नाली बांधण्यात आली नाही. येवढेच नाही तर नाली तील पाणी निघण्याकरिता मार्ग काढण्याचा विसर ग्रामपंचायत व कंत्राटदारांना पडला परिणामी त्यात पावसाचे पाणी कोंबून राहत आहे. पाणी निघण्याचा मार्ग नसल्याने मोठी घाण निर्माण झालेली आहे. सदर खड्या मुळे परिसरातील छोट्या मुलांनाही मोठी भीती निर्माण झालेली असून अनेक छोटू मुले खड्यात पडल्याची माहिती आहे, त्यामुळे जीवित हनी सह आरोग्याचा सुद्धा प्रश्न गंभीर बनला आहे.


सुशी दाबगावं येथे आरोग्याची मोठी समस्या उद्भवत असून डासांचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच अनेक ठिकाणी खड्यांमध पावसाचे पाणी साचून राहत असल्याने डेंग्यू, मलेरिया, फायलेरिया सारख्या अनेक आजाराचा प्रसार होऊन त्यात नागरिकांचा नाहक बळी होण्याचे नाकारता येत नाही.
याबाबतीची सूचना ग्राम पंचायत प्रशासनास व ग्राम सेवक असूनसुद्धा काहीच कार्यवाही होत नसल्याने. ग्राम पंचायत प्रशासन डेंग्यू मलेरिया सारख्या आजारात बळी जाण्याची वाट पाहते काय ? असा प्रस्न नागरिकांना पडला आहे.
तरी संबंधित वरिष्ठ प्रशासनाने लक्ष वेधून तातडीने समस्या निकालात काढावी व नागरिकांना होणारा नाहक त्रास वाचवावा अशी मागणी जोर धरत आहे.