मूल: तालूक्यातील नांदगाव येथील आदिवासी प्रवर्गातील अपंग,निराधार,परित्यक्त्या,भूमिहीन अशा पात्र नागरिकांना राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि अप्पर आयुक्तआदिवासी विकास चंद्रपूर तथा प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास कार्यालय चंद्रपूर यांच्या संयोजनाने मुल तालुक्यामध्ये गरजू आणि पात्र आदिवासी समाजातील नागरिकांचा खावटी अनुदानासाठी सव्र्हे करण्यात आला होता. त्या अंतर्गत मुल तालुक्यातील आदिवासी समाजातील नागरिकांना खावटी अनुदान अंतर्गत साहित्याचे वितरण करण्यात येत आहे.
सरपंच हिमानी ताई वाकुडकर उपसरपंच सागरभाऊ देऊरकर यांच्या हस्ते पात्र लाभाथ्र्यांना खावटी अनुदानांतर्गत किटचे वाटप करण्यात आले.वितरण कार्यक्रमाला आज पासून सुरूवात झाली असून 688 लाभार्थी आदिवासींना यायोजनेचा लाभ मिळणार आहे. या प्रसंगी ग्रामपंचायतनादगाव पदाधिकारी व नागरीकांची उपस्थिती आदिवासी बांधवांनाखावटी अनुदानांतर्गत आश्रम शाळा नांदगाव,येथे साहित्य वितरण करण्यात आले.व लाभार्थी संपे पर्यंत हे वितरण सुरू राहणार आहे.यावेळी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी,माजी सरपंच राजारामजी गेडाम,मुख्याध्यापक बक्षी सर,तसेच खावटी साहित्य वाटप कार्यक्रमाचे समन्वयक रूस्तम चव्हाण सर आणि ग्रामस्थ हजर होते.