Home आपला जिल्हा १२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

१२ वीचा निकाल उद्या जाहीर होणार; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

124

12 वीचा निकाल उद्या जाहीर होणार असून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२वीचा निकाल उद्या दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. जाहीर होईल.असे वर्षा गायकवाड यांनी म्हंटल

बारावीचा निकाल जुलै महिन्यातच जाहीर होणार असल्याचं राज्याच्या शिक्षण मंडळानं सांगितलं होतं. पण राज्यात अनेक ठिकाणी पूर आला त्यात बोर्डाचे प्रशासकीय काम राहिले असल्यानं निकाल ऑगस्ट महिन्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं.

 

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा सन २०२१ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल.

अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

hscresult.mkcl.org

Maharashtra.nic.in