पंतप्रधान मुद्रा योजना लावणार हातभार,व्यवसाय सुरू करायचाच? घ्या 10 लाख रूपये

63

व्यवसाय सुरू करायचाच? घ्या 10 लाख रूपये   पंतप्रधान मुद्रा योजना लावणार हातभार
मूल :— कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांना व्यवसायात तोटा सहन करावा लागत आहे.काहीनी उमेदीने सुरू केलेल्या व्यवसाय डबघाईला आला आहे. अशा स्थितीत या सर्वांना धीर देण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना लाभदायक ठरत आहे.
काय आहे योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पंंतप्रधान मुद्रा योजना (पीएमएमवाय) सुरू केली.
बॅंकांचे नियम पूर्ण करू शकत नसल्याने ज्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळत नाही.त्यांच्यासाठी ही योजना आहे.
तसेच ज्यांच्याकडे स्वत:चा लघुउद्योग आहे किंवा भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याइतपत आवश्यक कागदपत्र आहेत,त्यांनाही या योजनेंतर्गत कर्ज घेता येते.

कर्ज किती मिळू शकते ?
पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत तीन टप्यात कर्ज मिळते
शिशु कर्ज :— अंतर्गत 50 हजार रूपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
किशोर कर्ज :— अंतर्गत 50 हजार ते 5 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळते
युवा कर्ज :— अंतर्गत 5 ते 10 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

कर्ज कोणाला मिळू शकते ?
पंतप्रधान मुद्रा योजना केवळ छोटे व्यापारी आणि व्यावसायिकासाठी आहे.
मोठया गुंतवणुकीची आवश्यकता भासणारा व्यवसाय सुरू करायची असेल तर या योजनेतंर्गत कर्ज मिळू शकत नाही.
छोटया आकाराचे असेंम्बिंग युनिट,सव्र्हिस सेक्टर युनिट,खाद्यपदार्थाची विक्री करणारे,दुरूस्तीची दुकाने चालवणारे,लघु उद्योजक,अन्नप्रकिया,उद्योजक इत्यांदीना पंतप्रधान मुद्रा योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

आपल्या गरजेनुसार कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करण्याची संधी
पंतप्रधान मुद्रा योजनेव्दारे उपलब्ध होते.