ओबीसी समाज आणि युवा क्रांती संघटना मूल तर्फे विकास पुरुष महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी मंत्री, तथा विद्यमान लोकलेखा समिती प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर

71

रक्तदान शिबिराला युवकांचा मोठ्याप्रमाणात उस्फुर्त सहभाग
मुल :- येथे ओबीसी समाजाचे श्री. मा.निखिल वाढई प्रणित पाल, सुधीर वाडगुरे, सौरभ वायडे, हर्षल भुरसे व युवा क्रांती संघटनचें श्री आकाश येसनकर, निहाल गेडाम, सुरज गेडाम, रोहित शेंडे यांच्यातर्फे रक्तदान शिबिर संपन्न

मुल शहरातील तथा तालुक्यातील असंख्य युवकांनी जवळपास 51 च्या वर युनिट रक्तदान केले.
जागतिक कोरणा मारीच्या भयंकर काळामध्ये आम्ही ओबीसी समाज व युवा क्रांती संघटनेच्यावतीने मा. विकास पुरुष महाराष्ट्राचे लाडके नेते मा.माजी पालकमंत्री, अर्थमंत्री, वन मंत्री तथा विद्यमान आमदार लोकलेखा समितीचे प्रमुख श्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरांमध्ये रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. रक्तदान शिबिर मध्ये 51 च्या पलीकडे युवकांनी खूप उत्सवानी रक्तदान करून आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वरचा प्रेम व्यक्त केला आहे. सदर रक्तदान हा कित्येक गरजू लोकांना जीवनदान ठरणार आहे असे समाज उपयोगी कार्य आदरणीय सुधीर भाऊ चा कार्यातून मिळत राहील व भविष्यात ही अशाच प्रकारे आमच्या हातून सामाजिक कार्य घडत राहील अशी ग्याही युवा क्रांती संघटना कडून देण्यात आली. आदरणीय भाऊंना उदंड उत्तम आरोग्य लाभो हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.
चंद्रपूर रुग्णालयाचे डॉक्टर साहेब व त्यांच्या टीमचे आभार मानले तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे श्री प्रशांतभाऊ बोबाटे, चंदू भाऊ आष्टनकर यांचे सुद्धा ओबीसी समाज व युवा क्रांती संघटना तर्फे आभार मांडण्यात आले.
वाढदिवसानिमित्त रक्तदान हेच महादान हा संकल्प ठेवून ओबीसी समाज व युवा क्रांती संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या उस्फुर्तपणाने सहभाग घेऊन रक्तदानाचे कार्य केले. अत्यंत उत्तम पद्धतीने रक्तदानाचे कार्य पार पडले. ओबीसी समाज व युवा क्रांती संघटना संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अतिशय परिश्रम करुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले याबद्दल चंदू भाऊ आष्टनकर व प्रशांत भाऊ बोबाटे यांनी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच रक्तदात्यांचे आभार मानले. सदर रक्तदान शिबिराचे आयोजन अत्यंत उत्तम पद्धतीने पार पाडणारे ओबीसी समाज व युवा क्रांती संघटना शाखा मुल चे निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, निहाल गेडाम,सुरज गेडाम,रोहित शेंडे, अक्षय दुमावार, हर्षल भुरसे, सुधीर वाडगुरे, साहिल खोब्रागडे, सौरभ वायडे, भाग्यवान तेलसे, मिटुसिंग पटवा, पंकज कोहडे,सागर इंनम्मवार, रोशन गुरनुले,तुषार चौधरी,सागर मुठावार, स्वप्नील लाटेलवार, मंथन खैरे,तथा असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.