मुल तालुक्यात अतिवृष्टीचा फटका महसूल प्रशासनाने घेतली नोंद : नुकसानाचे सर्वेक्षण सुरूच
मूल तालुक्यात 104 घरांची अंशत :पडझड
नुकसान झाले असल्याची माहिती महसूल प्रशासन जवळ असल्याचे तहसीलदार डॉ.रविन्द्र होळी
मूल :— बूधवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या पावसाची माहीती गुरूवारी दिवसभर महसूल प्रशासनाने घेतली. सततधार सुरू असलेल्या पावसामुळे घराचे अंशत: नुकसान झाले. इतर मंडळात मिळालेल्या माहितीनुसार,कोणतेही तालुक्यात शुक्रवार पर्यंत 589.2 मि.ली.पाण्याची नोंद झाली असून 104 घरांची अंशता पडझळ झालेली आहे. मूल तालुक्यात दिवसापासून सतत पावसाने हजेरी लावल्याने खोळबलेली रोवणी परत सुरू झाली आहे. यामुळे शेतक—यांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे.
पाण्याचे साधन असलेल्या शेतक—यांनी परे टाकले,व ज्यांना मोटार पपंच्या जाण्याची सोय होती अशा काही ठराविक शेतक—यांनी रोवणीला सुरूवात केली मात्र पाण्याअभावी सुरू असलेले रोवणे बंद करावे लागले,परंतु गेल्या दिवसापासुन सुरू असलेल्या सतत मुसळधार पावसामुळे शेतक—यांनी रोवणीच्या कामाला सुरूवात केली.
मूल तालुक्यात शुक्रवार पर्यंत 589.2 मि.ली. पाण्याची नोंद तहसील कार्यालयात आहे.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 104 घरांचे अंशता नुकसान झाले असून यामध्ये मूल 70,विहीरगांव 2,राजोली3,चिखली 4 ,
चिमढा 3, चिरोली 7,केळझर 1,नलेश्वर 4,चिचाळा मोकासा 2, राजगड 2, भेजगाव 2, पिपरी दिक्षीत 1,बेंबाळ 2,नांदगाव 1 या गावाचा समावेश आहे.नुकसान झाले असल्याची माहिती महसूल प्रशासन जवळ असल्याचे तहसीलदार डॉ.रविन्द्र होळी यांनी सांगितले.