विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

40

चंद्रपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवगार्तील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेत स्थळावर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदर संकेत स्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी

                                             दि. ५ ऑगस्ट २0२१ पयर्ंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसगार्मुळे काही महाविद्यालये बंद आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, असे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने अर्ज भरण्यास मुदतवाढ दिलेली आहे. नागपूर विभागातील महाविद्यालयामध्ये सन २0२0-२१ मध्ये प्रवेश घेतलेले व शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज तात्काळ संकेत स्थळावर ऑनलाइन स्वरूपात सादर करावेत.