शेतकर्‍यांनी विमा योजनेचा लाभ घ्यावा ! चुकून अपघात किंवा इतर अपघात झाल्यास मिळणार योजनेचा लाभ

67

शेती करताना किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचा अपघात होऊन अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास त्या शेतकार्‍याला अथवा त्याचा वारसानाला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश विंचूदंश, विजेचा शॉक बसने इत्यादी. नैसर्गिक आपत्तीमुळे होणार अपघात, रस्त्यावरील अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे मृतअपघात यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांचा मृत्यू ओढवत असतो तर काहींना अपंगत्व येते.
घरातील का व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सन २00५-0६ पासून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना कार्यान्वित केलेली आहे. सन २0१५-१६ मध्ये सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना महाराष्ट्र राज्यात सुरु करण्यात आली आहे. शेतकरी खरीप हंगामाच्या कामांमध्ये व्यस्त आहे.
शेती व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे चुकून अपघात झाल्यास किंवा इतर कोणताही अपघात झाल्यास शेतकर्‍यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.