मूल :— मोटार सायकल चोरी प्रकरणी एका आरोपीस मंगळवारी अटक करण्यात आली.आरोपीचे नाव दिलीप गणपत मानकर राहणार डोंगरगाव सिंदेवाही असे आहे. आरोपीची न्याायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मूल तालुक्यातील डोंगरगाव येथील मंजूर काम करणा—या मेघशाम दादाजी लेनगुरे यांची जुनी घेतलेली मोटार सायकल क्र.एम.एच.34 टी 6675 ही 20जुनच्या रात्री चोरीला गेली. त्यांनी तब्बल एक महिन्यानंतर चोरीला गेलेल्या मोटार सायकलच्या कागदपत्रासह मूल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
अज्ञाता विरूध्द गुन्हा दाखल करून मूल पोलिसांनी तपास सुरू केला.तालुक्यातील चिचाळा येथील देविदास श्रावण बोबाटे याने एक महिण्यापूर्वी जुनी मोटार सायकल विकत घेतल्याची माहिती मिळाली. फिर्यादीने चोरीला गेलेली मोटार सायकल ओळखली. तपासाअंती ही मोटार सायकल बोबाटे याने सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथील दिलीप गणपत मानकर यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.
याबाबत सदर आरोपी दिलीप मानकर यांस त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. मोटार सायकल चोरीच्या प्रकरणात त्याच्या विरूदध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पोलिस कोठडीनंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस अधिक्षक अनूज तारे,आणि पोलीस निरिक्षक सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे पोलिस उपनिरिक्षक पुरूषोत्तम राठोड,पोलिस कर्मचारी चिमाजी,श्रावण,गजानन,संजय करीत आहे.