पावसामुळे पाणी नागरिकांच्या घरात !

27

जुन्या वस्ती मधील साचलेला पाणी जाण्यासाठी कुठच मार्ग नसल्याने

मूल :— रविवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या पावसामुळे रस्ते आणि नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी चक्क नागरिकांच्या घरात शिरले. गुडघाभर पाणी घरात जमा झाल्याने वॉर्डवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागला. हा फटका येथील वार्ड क्रमांक 9 आणि 10 मधील जनतेला रविवारी रात्राीच्या सुमारास बसला.मूल येथे विकास कामांतर्गत वॉर्डावॉर्डात सिमेंट रस्ते आणि नाल्या बनविण्यात आल्या आहे.मात्र,हे बांधकाम करताना योग्य नियोजन करण्यात आले नाही.सिमेंट पाईपने नाल्या तयार करण्यात आल्या आहे.

रस्ते व नाल्या उंच झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.दरम्यान मूल येथे रविवारी रात्रीच्या सुमारास मेघगर्जने सह मुसळधार पाऊस झाला. यावेळी रस्तावरचे पाणी नालीमध्ये न जाता नागरिकांच्या घरात जमा झाले. याचा वार्ड क्रमंाक 9 आणि 10 येथील सुभाष नगरातील रहिवाशांना मोठा फटका बसला.


तसेच जुन्या वस्ती मधील विश्रागगृहाजवळील रोडच्या खुल्या प्लॉटवर पावसाच्या पाणी सोचल्याने डूुकराचा वावर निर्माण झालेला आहे साचलेला पाणी जाण्यासाठी कुठच मार्ग नसल्याने तिथे पाणी साचून असल्यामुळे डेंगू,मच्चर,डास यांचा त्रास नागरीकांना होत आहे.

घरातील संपूर्ण खोल्या पावसाच्या पाण्याने वेढत्या गेल्या.नागरिकांना आपल्या घरातील सामान उंच ठिकाणी ठेवावे लागले.घरातील पाणी काढता—काढता ब—याच लोकांच्या नाकीनऊ आले.पावसाचे पाणी घरात शिरल्याने वॉर्डात एकच हाहाकार माजला. याबाबत कळताच मूलचे तहसीलदार डॉ.रविंद्र होळी यांनी रात्रीच घटनास्थळी पाहणी केली.