महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाच्या माध्यमातून माझी पोषण परसबाग अभियान

25

‘ माझी पोषण परसबाग’ मोहीम
मूल  :— तालुक्यात चिमढा येथे नागरिकांना अन्न,आरोग्य,पोषण आणि स्वच्छता मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानाच्या माध्यमातून माझी पोषण परसबाग अभियान राबविण्यात येत आहे.तालुक्यातील चिमढा येथे 16 जूर्ले रोजी पोषण परसबाग तयार करण्यात आली.
कोविड परिस्थितीत ताजा भाजीपाल्याचा तुटवडा दूर करणे व जोखीम प्रवण व्यक्ती व कुटुंबाच्या अन्नसुरक्षेचा आणि पोषण सुरक्षेच्या प्रश्न निकाली निघण्यास यामुळे मदत होणार असून कुपोषणमुक्तीसाठी हातभार लागणार आहे.
सदर पोषण परसबागमध्ये सेंद्रिय पध्दतीने पिकवलेला भाजीपाला,फळभाज्या,औषधी वनस्पती या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. अशी माहिती तालुका अभियान व्यवस्थापक माया सुमटकर यांनी दिली आहे.
यामुळे शहरी व ग्रामीण भागातील व्यवहारावर परिणाम झाला आहे. ग्रामीण भागामध्ये पोषण आहाराचा प्रश्न बिकटझाला आहे. रायायनिक खताच्या वापरातून उत्पादित भाजीपाला बाजारात मिळतो.त्याचे भावही अव्वाच्यासव्वा असतात त्यावर पर्याय शोधून ग्रामीण भागातील लहान मुले,किशोरी मुले,गरोदर माता,स्तनदा माता यांना आहारामध्ये पोषकद्रव्ये मिळावी व कमी खर्चामध्ये पोषक सेंद्रिय पध्दतीने उत्पादित फळभाज्य,पालेभाज्य व औषधी वनस्पती त्यांच्या गावात दररोज उपलब्ध व्हाव्यात यासाठी उमेदच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता समूहाच्या मार्फत माझी पोषण परसबाग तयार करण्यात आली आहे.
कार्यक्रमासाठी सरपंच कालीदास खोब्रागडे,उपसरपंच लेनगुरे,समता महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा जीवनकला लेनगुरे,तालुका व्यवस्थापक प्रकाश तुराणकर,नीलेश जीवनकर,प्रभाग समन्वयक हेमचंद बोरकर,अमर रंगारी,भावना कुमरे,मयूर गडमवार,स्नेहल मडावी,गीता चलाख,पौर्णिमा खोब्रागडे,दीक्षा मोहूर्ले ,कविता सुरमवार,वर्षा बल्लावार,कविता गंगासागर,सीमा लाडवे,उषा बोरकर उपस्थीत होते.