खाजगी शाळा पालक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासह, संबधीत काॅन्व्हेंटचे मुख्याध्यापक व प्रशासनाची चर्चा

37

मूल :- येथील उपविभागीय अधिकारी मान. महादेवजी खेडकर साहेब यांनी मूल येथील 9 काॅन्व्हेन्टची बैठक प्रशासकीय भवनातील सभागृहात दुपारी 12 वाजता आयोजीत केली होती, सभेच्या सुरूवातीला मान उपविभागीय अधिकारी साहेबांना संघर्ष समितीचे शिष्टमंडळ भेटुन निवेदन दिले, यावेळी शैक्षणिक विषयावर अनेक चर्चा झाल्या, यावेळी शिष्टमंडळातील 4 व्यक्तींना सभेत बसण्याची परवानगी दिली, यावेळी पालक संघर्ष समितीचे किशोरभाऊ कापगते, प्रशांत समर्थ, मंगेश पोटवार, भोजराज गोवर्धन यांनी सभेत उपस्थिती दर्शविली,
सभेला उपविभागीय अधिकारी मान. महादेवजी खेडकर साहेब, तहसीलदार डाॅ. रविंद्र होळी साहेब, मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम साहेब, नायब तहसीलदार यशवंतजी पवार, नगर पालीकेचे प्रशासकीय अधिकारी तुशार शिंदे, मूल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी खांडरे साहेब, मूल नगर पालीकेचे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे व विविध काॅन्व्हेंटचे मुख्याध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनानुसार चर्चेला सुरूवात झाली.
1) शिक्षण फि माफ करण्याबाबत
शिक्षक पालक संघाच्या ठरावानुसार शाळेने फि ठरविलेली असल्यामुळे 70 टक्के फि आकारणी करण्यात येत असल्याचे सेंट अॅन्स हायस्कुलच्या मुख्याध्यापीका सालेट यांनी सांगीतले, यावर मान उपविभागीय अधिकारी खेडकर साहेब यांनी कोरोना संक्रमनामुळे अनेक पालक आर्थीक अडचणीत सापडलेले आहेत, त्यामुळे शासकीय कर्मचाÚया व्यतिरीक्त खाजगी व्यवसाय करून जिवन जगणाÚया पालकांकडून शिक्षण फि 50 टक्के घेण्याची विनंती केली. यावर शाळा प्रशासनानेही सकारात्मक पाऊल उचलु असे आश्वासन दिले.
2) 35 विद्याथ्र्यापेक्षा जास्त विद्यार्थी एका वर्गात बसवु नये
40 ते 45 विद्यार्थी एका वर्गात आहेत, आणि आॅनलाईन शिक्षण असल्याने कमी जास्त विद्यार्थी उपस्थित असतात. शाळा सुरू झाल्यानंतर याबाबत निर्णय घेवून असे ठरविण्यात आले.
3) शाळेत शिकविणारे शिक्षक हे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविण्याच्या पात्रतेनुसार असावेत
शाळेतील संपुर्ण शिक्षक हे शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविण्यास पात्र असल्याचे मुख्याध्यापकानी यावेळी सांगीतले.
4) एकदा शाळेत प्रवेश घेतल्यानंतर विद्याथ्र्यांकडुन वारंवार प्रवेश शुल्क घेण्यात येवू नये
शाळा सुधार फंड या शीर्षकाखाली शाळेनी इयत्ता 1, इयत्ता 5 वी आणि इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश शुल्क घेतले जाते, मात्र मान. उपविभागीय अधिकारी साहेब आणि मान. गटशिक्षाधिकारी साहेब यांनी हे नियमाला धरून नाही, यामुळे एकदाच प्रवेश शुल्क घेण्यात यावे असे सांगीतले.
5) बिआरसी मार्फत गरीब विद्याथ्र्यांना प्रवेशासाठी नियमावली ठरवुन प्रवेश घ्यावा
मूल शहरातील 9 पैकी 7 शाळेत यानियमानुसार प्रवेश दिला जातो, परंतु सेंट अॅन्स हायस्कुल आणि सीबीएसई ही शाळा अल्पसंख्याक विद्याथ्र्यासाठी राखीव असल्याने हे नियम याठिकाणी लागु नसल्याचे मुख्याध्यापकांनी यावेळी सांगीतले.
6) नविन प्रवेश घेणाÚया विद्याथ्र्याकडून डोनेश न घेवू नये
कोरोना संक्रमण असल्यामुळे डोनेशन घेवू नये असे शाळेच्या मुख्याध्यापकाना सांगण्यात आले.
7) जुने पुस्तके घेण्याची परवानगी देण्यात यावी
याबाबत चर्चेअंती सर्व शाळेनी विद्याथ्र्यांना जुने पुस्तके घेण्यास परवानगी दिलेली आहे.
8) शिक्षक-पालक समिती निवड करताना सर्व पाल्याना विश्वावासात घेवून तयार करावे
मागील 2 वर्षापासुन शिक्षक-पालक समिती बदलविण्यात आलेली नाही, याबाबत शासन परिपत्रक असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगीतले, मात्र पालकांच्या समस्या संदर्भात वारंवार झुम मिटींग घेण्यात यावे असेही सर्व मुख्याध्यापकांना सांगीतले.
चर्चेअंती शाळा प्रशासनाने नियमाचे उल्लंघन केल्यास त्याशाळेविरूध्द पालकांनी तक्रार करावी, तक्रारीनुसार शाळेवर कारवाई करण्यात येईल असेही मान. उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर साहेब यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगीतले.