मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर तालुक्यातील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्‍यात – आ. सुधीर मुनगंटीवार

35

 

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सुरू असलेल्‍या पाणी पुरवठा योजनांचा आ. मुनगंटीवार यांनी घेतला आढावा घेतला

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला. मुल तालुक्‍यातील २४ गावे, पोंभुर्णा तालुक्‍यातील १५ गावे तर बल्‍लारपूर तालुक्‍यातील १८ गावे अंतर्भूत असलेल्‍या सदर योजनेचा विस्‍तृत आढावा आ. मुनगंटीवार यांनी घेतला.

याप्रसंगी जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी, महिला व बालकल्‍याण सभापती रोशनी खान, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, अॅड. हरीश गेडाम, वैशाली बुध्‍दलवार, गौतम निमगडे, रामपाल सिंह, पंचायत समिती पोंभुर्णांच्‍या सभापती अलका आत्राम, पंचायत समिती चंद्रपूर सभापती केमा रायपुरे, रमेश पिपरे, नामदेव आसुटकर, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा (जि.प.) व अन्‍य अधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी या सर्व कामांची प्रशासकीय मान्‍यता कधी मिळाली, त्याची किंमत किती , टेंडर कधी झाले, काम पूर्ण करण्‍याचा कालावधी किती होता, त्‍याला उशीर झाला असल्‍यास काही दंड ठोठावला कां व तो वसुल झाला कां असे अनेक प्रश्‍न आ. मुनगंटीवार यांनी अधिका-यांना विचारले. मुल तालुक्‍यातील सार्वजनिक ठिकाणी ऑक्‍टोबर २०२१ पर्यंत, पोंभुर्णा तालुक्‍यातील काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करण्‍याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले . कामांच्या गुणवत्ते बाबत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही असे बजावत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल पुरवठा होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या.