आपले सरकार सेतू केंद्र आता सोमवार ते शुक्रवार सुरू Ø सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुविधा मिळणार

51
चंद्रपूर दि.13 जुलै : सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नसर्गिक आपत्ती किंवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याकरीता चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील आपले सरकार सेतू केंद्र ( सी.एस.सी.) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7.00 ते सायंकाळी 7.00 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.
शेतक-यांनी आपले सरकार सेतू केद्रांमार्फत नेमुन दिलेल्या वेळेत योजनेच्या विहीत कालावधीतच अर्ज दाखल करावा. जेणेकरून सेतू केंद्रावर अचानक गर्दी तसेच नागरीकांकडून कोविड वर्तणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही. यासाठी सर्व संबधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी सदर आदेशाची काटेकोरपणे अमंलबंजावणी करावी.
सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.13 जुलै 2021 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशात नमूद आहे.