NEET 2021 Exam Date | जाहीर झाली नीट परीक्षेची तारीख, सप्टेंबरमध्ये ‘या’ दिवशी होईल परीक्षा; अर्ज प्रक्रिया उद्यापासून

24

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नीट परीक्षेच्या तारखांची घोषणा (NEET 2021 Exam Date ) अखेर झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी यासंबंधी घोषणा केली आहे. शिक्षण मंत्र्यांनी ट्विट करून सांगितले की, NEET (UG) 2021 ची परीक्षा 12 सप्टेंबरला होईल. अगोदर ही परीक्षा 1 ऑगस्टला होणार होती. त्यांनी सांगितले की, या दरम्यान कोविड-19 प्रोटोकॉलची पूर्ण काळजी घेतली जाईल. NTA च्या वेबसाइटवर मंगळवारपासून यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू होईल. NEET 2021 Exam Date | neet 2021 ug exam date announced neet ug 2021 will be held on 12 september

केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले की, कोविड-19 प्रोटोकॉल पाहता सर्व विद्यार्थ्यांना सेंटरवरच फेस मास्क उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय एंट्री आणि एग्झिटसाठी टाइम स्लॉट ठरवला जाईल.
कॉन्टॅक्टलेस रजिस्ट्रेशन, सॅनिटायजेशन आणि सोशल डिस्टन्सिंगसह बसण्याची व्यवस्था ठरवली जाईल. सोशल डिस्टन्सिंगचा मापदंड पूर्ण करण्यासाठी ज्या शहरांमध्ये परीक्षा होणार आहे.
त्यांची संख्या वाढवून 198 केली आहे. परीक्षा केंद्रसुद्धा 2020 च्या तुलनेत वाढवून 3862 केली आहेत.

कोरोनामुळे गडबडली व्यवस्था

कोरोना व्हायरसमुळे देशात शिक्षण व्यवस्था खुप जास्त गडबडली आहे. महामारीमुळे बोर्ड परीक्षा रद्द करावी लागली आहे. सोबतच उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा सुद्धा स्थगित कराव्या लागल्या, देशभरात लाखो विद्यार्थी NTA NEET 2021 रजिस्ट्रेशनच्या तारखेची प्रतिक्षा करत होते.

कधीपासून करू शकता अर्ज

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Education Minister Dharmendra Pradhan) यांनी सांगितले की, अर्ज प्रक्रिया मंगळवार 13 जुलैपासून सुरू होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ची वेबसाइट nta.ac.in किंवा ntaneet.nic.in वर अर्जाची लिंक जारी करण्यात आली आहे. विद्यार्थी दोन्हीपैकी एका वेबसाइटवर जाऊन हा फॉर्म भरू शकतात.