तालुक्यातील बेंबाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने योग दिवस साजरा करण्यात आला. पंचायत समिती सभापती चंदु मारगोनवार यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या योगा कार्यक्रमात योगा प्रशिक्षक श्रीमती गयाबाई कडवलवार यांनी सहभागी कार्यकर्त्यांना योगाचे धडे दिले.
शरीर व मनाच्या उत्तम आरोग्यासाठी नियमित योगाचे धडे गिरवल्यास सर्व रोगांपासुन मुक्त असे निरोगी जीवन लाभते. असे सांगतांना युवकांनी नियमित योगाचे धडे घ्यावे. असे आवाहन केले. यावेळी सभापती चंदु मारगोनवार यांचे हस्ते श्रीमती गयाबाई कडवलवार आणि बेंबाळ येथील प्रतिकार संस्थेचे सदस्य यांची अलीकडेच पोलीस स्टेशन वर्धा येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल राहुल इटेकर यांचा शाल, श्रीफळ देवुन सत्कार केला. यावेळी उपसरपंच मुन्ना कोटगले, विशाल कञोजवार आणि घनश्याम दयालवार यांचेसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.